💥पुर्णा न.पा.च्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची लिज कागदोपत्री ? लिजधारकच बनले मालक : गाळ्यांची परस्पर खरेदी विक्री...!


💥नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांच्या महसुला लावली कात्री💥



पुर्णा (दि.०९ मे २०२२) - पुर्णा नगर परिषदेचा कारभार अंधेर नगरी चौपट राज अश्या पध्दतीचा झाला असून नगर परिषदेतील सर्वसाधारण कर्मचारी देखील स्वतःला मुख्याधिकारी भासवून परस्पर मुख्याधिकारी यांच्या खोट्या स्वाक्षरी करीत घोटाळे करीत असतांना मात्र नगर परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी संबंधित भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या दुष्कृत्यावर पांघरूण टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे 'आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा' अशी परिस्थिती नगर परिषदेची झाली आहे.


पुर्णा नगर परिषदेतील घोटाळ्यांची मालिका शेवटी थांबणार तरी केव्हा ? या प्रश्नाचे उत्तर साक्षात इंद्र देवालाही देता येणार नाही कारण नगर परिषदेला सक्षम व कर्तव्यकठोर अधिकारी अद्यापही लाभला नसल्यामुळे नगर परिषदेचा कारभार निरंकूश झाल्याचे दिसत असून या परिस्थितीचा फायदा नगर परिषद प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यांसह शहरातील नगर परिषदेच्या मालकी हक्कातील व्यापिरी संकुलातील व्यवसायिक गाळ्यांचे लिजधारक मागील अनेक वर्षांपासून घेत असून नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना परस्पर हातात धरून संबंधित लिजधारकांनी या नगर परिषदेच्या व्यवसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्रीला सुरूवात केल्याने अल्पशा दरात लिज करून व्यवसायासाठी नगर परिषदेकडून मिळवलेले गाळे संबंधित लिजधारक लाखो रुपयांत विक्री करतांना दिसत असून संबंधित गाळेधारक नगर परिषदेला मासिक भाड्यापोटी हजार/पाचशे रुपयांत बोळवण करीत असल्याचे दिसत आहे.

पुर्णा शहरातील मुख्यबाजारपेठेत हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल तसेच जुना मोढ्यातील गोधळ सम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहा लगत तसेच शहरील छत्रपती संभाजी महाराज चौक लगत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलात नगर परिषदेच्या मालकी हक्काचे तब्बल जवळपास ११३ व्यवसायिक गाळे असून यातील मुळ लिज धारकांच्या लिजची मुद्दत संपून वर्षानुवर्षे झाली परंतु या मुळ लिजधारकांनी आपआपणे व्यवसायिक गाळे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत लाखो रुपयांत परस्पर विक्री करीत नगर परिषदेच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले असून या संदर्भात शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमआण्णा कहाते यांनी विभागीय आयुक्तांकडे मागील २०१३/१४ यावर्षी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती या तक्रारी नंतर तत्कालीन मुख्याधिकारी बुबने यांनी रितसर पंचणामा देखील केला होता परंतु संबंधित गाळे धारकांशी आर्थिक तडजोड करून या प्रकरावर पडदा घालण्याचे काम सोईस्करपणे करण्यात आले त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला संबंधित मुळ लिज धारकांनी लाखो रुपयांचा चुना लावीत गाळ्यांच्या भाड्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या महसुलालाही कात्री लागल्याचे दिसत असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी लिज संपलेल्या मुळ गाळे धारकांकडून संबंधित व्यवसायिक गाळे ताब्यात घेऊन त्या गाळ्यांचा पुन्हा लिलाव करावा व नव्याने लिज केलेल्या गाळे धारकांच्या मासिक भाड्यातही वाढ करावी जेणे करून नगर परिषदेच्या महसुलात वाढ होईल अशी मागणी होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या