💥गंगाखेड ते नरळद यात्रा स्पेशल बससेवा सुरू....!


💥सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार💥

परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध संत देवईमाय संस्थान नरळद याठिकाणी यात्रेनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी बसेची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली होती. सोमवार पासून गंगाखेड ते नरलद यात्रा स्पेशल बस सेवेस सुरुवात झाल्याची माहिती आगारप्रमुख ज्ञानेश्वर हडबे यांनी दिली.

नरळद येथे जाण्यासाठी भक्तांना सोय व्हावी यासाठी यात्रा स्पेशल बस सुरू कराव्यात अशी मागणी  गंगाखेड आगार प्रमुख ज्ञानेश्वर हाडबे यांच्याकडे करण्यात आली होती. परभणी लोकसभा मतदार संघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , वाघलगाव चे माजी सरपंच नारायण धनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच  जयदेव मिसे ,  विक्रम बाबा इमडे, मरडसगावचे नागेश शिंदे आदींनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. नरलद येथे संत देवयमाय यांची समाधी आहे. येथे दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दरवर्षी जमा होतात. 16 मे सोमवार व 17मे मंगळवार असे दोन दिवस या ठिकाणी यात्रा भरते. या संस्थानचे मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी भक्तांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केलेले आहे. यात्रेस दरवर्षी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कोरोना परिस्थिती संपल्यानंतर पहिल्यांदाच ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असून या वर्षी दर्शनासाठी उपस्थित असंणाऱ्या भाविकांची संख्या मोठी राहणार आहे. मंगळवारी दुपारी संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निवेदनाची आगार प्रमुख यांनी तात्काळ दखल घेतली असून या मार्गावर दर एक तासाला बस सोडणार असल्याचे त्यांनी  सांगितले. प्रवासी  भक्तांना काही अडचण आल्यास आगार प्रमुखाशी संपर्क साधण्याचे आव्हानही त्यांनी केलेले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या