💥'जनता सलोखा' उपक्रमांतर्गत आयोजित ०४ दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेची उत्साहात सांगता......!


💥यावेळी पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (आयपीएस) यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले💥 


फुलचंद भगत

वाशिम:-‘पोलीस – जनता सलोखा' उपक्रमांतर्गत वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे ०४ दिवसीय व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन दि.१४.०५.२०२२ ते दि.१७.०५.२०२२ या कालावधीत नवीन पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या ०४ दिवसीय स्पर्धेदरम्यान एकूण १० संघ विजेतेपदासाठी आपापसात भिडले. 


                      दि.१७.०५.२०२२ रोजीच्या उपांत्य फेरीमध्ये अंतिम सामन्याकरिता पात्र ठरलेले मंगरूळपीर व्हॉलीबॉल क्लब व पोलीस मुख्यालय, वाशिम संघ यांच्यामध्ये अंतिम लढत पार पडली. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मंगरूळपीर व्हॉलीबॉल क्लब हा संघ १३ गुणांनी विजयी ठरला असून पोलीस मुख्यालय वाशिमच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी वाशिम पोलीस दलातील पोलीस अधिकारी यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण सामना रंगला. ज्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे(IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी, पो.नि.श्री.सोमनाथ जाधव,

स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, रा.पो.नि.श्री.मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय वाशिम यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांनी मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये व्हॉलीबॉल खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला.अंतिम सामना संपल्यानंतर ०४ दिवसीय स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने करण्यात आला.ज्यामध्ये ‘बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' – सरशार दानिश (मंगरूळपीर संघ), ‘बेस्ट श्मॅशर' – रयाण खान (मंगरूळपीर

संघ), 'बेस्ट लिफ्टर' – उझेस खान (मंगरूळपीर संघ), 'बेस्ट सर्विस' – जितेंद्र जयशंकर पाटील (पोलीस मुख्यालय संघ)व 'बेस्ट डिफेन्सर' अतहर आलम खान यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांना आणखीन चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या पोलीस मुख्यालयाच्या संघाला रोख ७,०००/- रुपये बक्षीस, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विजेता ठरलेल्या मंगरूळपीर व्हॉलीबॉल संघास रोख १०,०००/- रुपयांचे बक्षीस,मेडल्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शेवटी या सर्व स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंममलदार, कवायत निर्देशक यांना पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले व भविष्यात अश्याचप्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. सदर स्पर्धेसाठी झटणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे व सहभागी संघांचे तोंडभरून कौतुक केल. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी मा.पोलीस

अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे (IPS), परिविक्षाधीन सहा.पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) यांच्या सूत्रबद्ध नियोजन व नियंत्रणाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी,

वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी, पो.नि.श्री. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, श्री.मांगीलाल पवार, रा. पो. नि.पोलीस मुख्यालय, वाशिम, श्री. राठोड, रा.पो.उप.नि., पोलीस मुख्यालय, वाशिम, ASI दिलीप घोडाम, ASI अज्ञानसिंग

ब्राम्हण, NPC मोहम्मद मौसिक, NPC आशिष जयस्वाल, PC आमीर खान, PC विठ्ठल सुर्वे व LPC माया मोरे आदींनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या