💥पुर्णेत तथागत भगवान बुद्ध जयंती दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन....!


💥विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजन💥

पूर्णा (दि.१३ मे २०२२) - महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा च्या वतीने भिखु संघाची धम्मदेशना व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती मंडळाने केलेले आहे.

दिनांक १६ मे २०२२ या दिवशी सकाळी ०५-३० वाजता परित्राण पाठ व त्रीरत्न वंदना बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी संपन्न होईल. सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ धम्म उपासिकाअनुसयाबाई यशवंतराव गायकवाड  यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल.

बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी सकाळी ०९-३० वाजता भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी ११-३० वाजता सामूहिक वंदना व पूजा पाठ संपन्न होईल. दुपारी बारा वाजता बुद्ध विहार पूर्णा पासून बुद्धमूर्ती ची वाद्यवृंदा सह रथा मध्ये मिरवणूक काढण्यात येईल समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होऊन धम्म सभेला सुरुवात होईल प्रमुख धम्मदेशना डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भिक्खू संघाची होईल.

सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धम्म उपासिका द्रोपदाबाई माधवराव नेरलीकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव नांदेड जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके पूर्णा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हानंद गावडे सेलू येथील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे रेल्वे कर्मचारी युनियनचे कांचन ठाकूर आदींची उपस्थिती असणार आहे

वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले सचिव इंजिनियर विजय खंडागळे कोषाध्यक्ष रोफ कुरेशी व जयंती मंडळ डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा पूर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या