💥राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मंगळवार दि.१० मे रोजी परभणी दौऱ्यावर...!


💥पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कृषि विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणाऱ्या विज्ञान संकुलाचे भव्य भूमिपूजन💥 

परभणी (दि.०७ मे २०२२) :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणाऱ्या विज्ञान संकुलाचे भूमिपूजन राज्याचे मा.पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार दि.१० मे २०२२ रोजी दुपारी ०३-०० वाजता संपन्न होणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यापीठ परिसरातील नियोजित जागेवर भव्य विज्ञान संकुल उभारण्यात येणार आहे. सदर संकुल उभारणीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.

या विज्ञान संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी विविध विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान संकुलाच्या नियोजित स्थळी दुपारी ठीक ०३-०० वाजता भूमिपूजन सोहळा होणार असून यानंतर सुवर्णजयंती दीक्षांत सभागृह विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय (अश्वमेध क्रीडांगण) व. ना. म. कृ. वि. याठिकाणी श्री. ठाकरे पालकमंत्री धनंजय मुंडे (मंत्री' सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री परभणी),  दादाजी भुसे (मंत्री,कृषी माजी सैनिक कल्याण) , उदय सामंत (मंत्रि, उच्च व तंत्रशिक्षण),  संजय जाधव (खासदार लोकसभा), डॉ राहुल पाटील (आमदार विधानसभा),  श्रीमती आंचल गोयल (भा. प्र. से. ) जिल्हाधिकारी परभणी , व. ना. म. कृ. वि. कुलगुरू डाँ.अशोक धवन,, डॉ रामेश्वर नाईक अध्यक्ष,  परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या उपस्थितीत परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांनी आजपर्यंत केलेल्या वैज्ञानिक उपक्रमांचे,  'तांबट' शॉर्ट फिल्म चे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच 'डे टाईम ऍस्ट्रॉनॉमी मध्ये सूर्यदर्शन व सौर डाग यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यानंतर इग्नायटेड माईंडस या विद्यार्थी गटांनी तयार केलेल्या रीसर्च पेलोड सॅटॅलाइट चे प्रक्षेपण होणार आहे. तरी सर्व विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनज आमदार डॉ राहुल पाटील यांनी व.ना. म. कृ. विद्यापीठ व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या