💥माझ्या मार्गाने पत्रकार कराल तर पदरी निराशाच पडेल ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी व्यक्त केली खंत...!


💥मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न💥

✍️ मोहन चौकेकर

मुंबई : माझ्या मार्गाने पत्रकारिता कराल तर तुम्हाला सुख, शांती, आनंद कधीही मिळवता येणार नाही अगदी १० टक्केवारीची घरे सुद्दा मिळवता  येणार नाही अशी खंत जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी व्यक्त केली.

मराठी पत्रकार परिषदेकडून शनिवारी विरार येथील विवा कॉलेजमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.एम.देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, इंदरकुमार जैन, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा आदाटे, कोकण विभाग सचिव विजय मोकल, महिला संघटक जान्हवी पाटील, सुनील जगताप आदी उपस्थित होते. 

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत  यांना जीवनगौरव पुरस्कार, आचार्य अत्रे युवा संपादक  पुरस्काराने निलेश खरे यांना, सावित्रीबाई फुले पुरस्काराने मृणालिनी नानिवडेकर यांना, रावसाहेब गोगटे पुरस्काराने अच्युत पाटील(पालघर) यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्काराने भारत रांजणकर,(अलिबाग) प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार दीपक प्रभावळकर(सातारा) , भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्काराने राजेंद्र काळे (बुलढाणा) यांना आणि नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्काराने उत्तम दगडू (वसमत) दीपक कैतके (मुंबई) यांना सन्मानित यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  पंढरीनाथ सावंत यांना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी माझ्या मार्गाने पत्रकारिता करू नका, पदरी निराशाच पडेल अशी खंत व्यक्त केली.

आजही पत्रकारांना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही, त्यासाठी अजूनही आपल्याला झगडावे लागते, आज पत्रकारांसाठी अनेक योजना कागदावरच आहेत, खऱ्या पत्रकारांना साधी पेन्शन देण्यात शासन कमी पडत आहे, या सगळ्या गोष्टींचा वाचा फोडण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे त्यासाठीच मराठी पत्रकार परिषद काम करतेय, ४० ते ५० वर्षे काम करून सुद्दा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे आजही चाळीतील खोलीत राहतात , शासनाकडून कोणतेच सहकार्य मिळाले नाही त्यांच्यासह आज अनेक पत्रकारांना न्याय मिळत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याची खंत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली.

  बदलत्या काळानुसार पत्रकारीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा बदल आपण स्वीकारला पाहिजे, तरच या क्षेत्रात आपण टिकू शकतो, नवनवीन गोष्टी शिकलात तर याचा निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांनी व्यक्त केली. वस्तुस्थिती मांडणारी पत्रकारिता लोप पावत चालली आहे, कौतुक करणाऱ्या बातम्या करतानाच समाजातील वाईट घटनांना वाचा फोडणाऱ्या गोष्टींचे प्रकढपणे लिखाण करता आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांचे कौतुक पत्रकारांच्या संघटनेकडून होतेय ही बाब माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे, पुरस्काराने सन्मानित झाल्यावर आमची अजून कामाप्रति जबाबदारी वाढली आहे, मराठी पत्रकार परिषद गेली अनेक वर्षे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढतेय अशी प्रतिक्रिया आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कारप्राप्त नीलेश खरे यांनी व्यक्त केली बियुजेचे इंदरकुमार जैन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जगताप यांनी तर आभार प्रदर्शन जान्हवी पाटील यांनी केले....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या