💥मयत महिलेचे पोस्टमार्टम नोट्स देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना लाचखोर पोलीस उपनिरीक्षक ताब्यात...!


💥लाचखोर पोलिस अधिकाऱ्यास २५ हजार रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून ५ हजाराची लाच घेताना घेतले ताब्यात💥 

चिंचवड :- पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास २५ हजार रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रार अर्ज तसेच पोस्टमार्टमची कागदपत्रे देण्यासाठी लाच घेतली होती.

चिंचवड पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास २५ हजार रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

तक्रार अर्ज तसेच पोस्टमार्टमची कागदपत्रे देण्यासाठी लाच घेतली होती विठ्ठल अंबाजी शिंगे (वय ५७) असे पकडण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल शिंगे हे चिंचवड पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. दरम्यान यातील ३६ वर्षीय तक्रारदार यांच्या भावाविरूद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आहे.

तसेच, भावाच्या पत्नीच्या पोस्टमार्टम नोट्स आणि इतर कागदपत्रे तक्रारदारांना हवी होती ती देण्यासाठी लोकसेवक शिंगे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे ए.सी.बी.कडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. 

त्यात तडजोडीने २५ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले त्यानूसार बुधवारी सायंकाळी सापळा कारवाईत या २५ हजार रुपयांच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये घेताना शिंगे यांना ए.सी.बी.ने रंगेहात पकडले. या कारवाईने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

* पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात :-

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणी चिंचवडचे पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षात अटॅच करण्यात आले आहे. तर एका उपनिरीक्षकाला देखील चिंचवडमधून हलविण्यात आले आहे तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी  रात्री दिले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या