💥मराठवाड्यातील पहिल्या ‘महिला व बाल विकास’ भवनाचे परभणी येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपुजन....!


💥‘महिला व बाल विकास भवन’ ची स्थापना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे💥

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत परभणी जिल्ह्याकरिता महिला व बाल विकास भवन मंजूर झाले आहे. वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालयाच्या शेजारी ‘महिला व बाल विकास भवन’ उभे राहणार असून या भवनाचे भूमिपुजन आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.


महिला व बाल विकासाच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये एकत्र स्थापन करुन महिला व बाल विकास विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या हेतुने परभणी जिल्ह्यात ‘महिला व बाल विकास भवन’ ची स्थापना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान सर्वश्री आमदार बाबाजानी दूर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या