💥वाढदिवसाचा केक तलवारीने कापने भोवले ; तलवारीसह आरोपी जेरबंद....!


💥वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील मानोरा येथील घटना💥 

मंगरुळपीर:-पोलीस स्टेशन मानोरा जि. वाशिम अंतर्गत दिनांक 06/05/2022 मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे आदेशाने वाशिम जिल्ह्यात माहे 05/2022 मध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत विशेष मोहीम राबविणेबाबत आदेश झाले असता पोलीस स्टेशन मानोरा जि. वाशिम हद्दीत दिनांक 04/05/2022 च्या रात्री ग्राम गिरोली येथील शेतातील मोकळ्या जागेत गिरोली येथील शेख सुफियान शेख आतिफ हे स्वता:चा वाढदिवस तलवारीने केक कापुन साजरा करीत असल्याबाबत व्हीडीओ दिनांक

05/05/2022 रोजी व्हॉट्सअप वर व्हायरल झाल्यानंतर ताबडतोब सदर घटनेची माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांना देण्यात आली, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, मा.ऊपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल जाधव

सोबत पोहेकॉ गणेश जाधव, नापोकॉ मयुरेश तिवारी, बालाजी महल्ले असे ग्राम गिरोली येथे जावुन तलवारीने केक कापणारा ईसम शेख सुफियान शेख आतिफ याचा शोध घेवुन त्वरीत त्याला ताब्यात घेवुन त्याचे घरातुन केक कापतांना वापरलेली तलवार जप्त करण्यात आली व पोलीस स्टेशनला सदर आरोपीस आणुन त्याचेविरुद्ध अप नं. 245/2022 कलम 4,25 आर्म अक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या