💥मंगरूळपीर येथे ईद निमित्य पोलीस विभागाचा 'जातीय सलोखा ऊपक्रम'....!


💥यामध्ये मुस्लीम बांधवानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला💥

(फुलचंद भगत)

मंगरुळपीर :- मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागात मुस्लीम बांधवाचे वतीने आज मंगळवार दि.०३ मे २०२२ रोजी ईदगाह व मस्जीद मध्ये नमाज पठन करुन रमजान ईद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ऊपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात आणी नेतृत्वात आणी ठाणेदार सुनिल हूड यांच्या ऊपस्थीतीत पोलिस विभागाकडुन मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देवून स्वागत करुन ईदनिमित्य शुभेच्छा देवुन 'जातीय सलोखा ऊपक्रम' राबवला.


                मागील दोन वर्षाचे काळात सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना विषाणूचे पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवांचे वतीने रमजान ईद साध्या पध्दतीने ईदगाहवर नमाज पठन न करता घरगुती स्वरुपात साजरा करण्यात आला होता.यावर्षी कारोनाचे निबंध उठल्यानंतर मुस्लीम बांधवांचे वतीने मंगरुळपीर शहरातील ईदगाहवर सुमारे ४००० मुस्लीम बांधवानी नमाज पठन करुन मोठया उत्सावात रमजान ईद उत्सव साजरा करण्यात केला. यामध्ये मुस्लीम बांधवानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


रमजान ईद निमीत्त मा.श्री.बच्चन सिंह पोलीस अधीक्षक वाशीम, मा. श्री.गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशीम यांचे मार्गदर्शनात वाशिम जिल्हा पोलीस दल व पोलीस स्टेशन मंगरुळपीर चे वतीने जातीय सलोखा अंतर्गत हिंदु, मुस्लीम व सर्वधर्मीयांचे एकमेकांचे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि हा सण प्रेमाने आनंदाने साजरा व्हावा या करीता ईदगाह मैदान मंगरुळपीर येथे मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याकरीता टेन्ट लावून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील शांतता समीतीचे सदस्य, पत्रकार बांधव, सामजीक संघटनाचे पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी श्री.यशवंत केंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर, श्री.सुनिल हुड, ठाणेदार मंगरुळपीर, सामाजीक कार्यकर्ते,शांतता समीती सदस्य श्री. सुनिल मालपानी, श्री.विवेक नाकाडे, श्री.सचिन परळीकर, श्री.मिलींद बोलके यांनी तसेच हिंदु व बौध्द बांधवांचे वतीने मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे आनंदात सहभागी झाले या आयोजना मुळे मंगरुळपीर शहरात हिंदू, मस्लीम व सर्वधर्मीय एकतेचे वातावण निर्माण झाले होते.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या