💥पुर्णा नगर परिषदेतील बोगस कर्मचारी भरती प्रकरण : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे धोरण...!

 


💥बोगस कर्मचारी प्रकरणात लाखो रुपयांची उलाढाल ? नगर परिषदेतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर 'धर्मभास्कराचे' भुत ?

जगात जर्मनी भारतात परभणी अन् परभणीत पुर्णा अन् इथ अस कुठलघ बोगस काम नाही जे अधिकारी कर्मचारी मिळून करणा ? असी अवस्था पुर्णा नगर परिषद प्रशासनाची झाली असून अशी नगर परिषद अख्या महाराष्ट्रात देखील नसेल जीथे बोगस काम अगदी सहजपणे केली जातात....अहो कोट्यावधी रुपयांच्या बोगस विकासकामांची बिल एखाद्या धाब्यावर शेतशिवारातील आखाड्यावर बसून बिनधास्त काढण्याची तय्यारी असलेले पुर्णा नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचारी अगदी सहजपणे शासकीय/निमशासकीय/खाजगी मालमत्ता सहजपणे बोगस कागदपत्रांच्या आधारे कोणाच्याही नावावर देखील लावून आपले हात ओलू करून घेतात कारण त्यांना माहित असते कोणी कितीही विरोध किंवा तक्रारी केल्या तरी आपल्या प्रमाणेच भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत डुबकी मारून धन्य झालेले वरिष्ठ भ्रष्ट अधिकारी आपल्या दुष्कृत्यावर पांघरूण टाकून आपल्याला निर्दोष असल्याचे सन्मानपत्र यथेच्छ बहाल करतील ? त्यामुळे कमालीची हिंम्मत वाढलेल्या या पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्टाचारात पिएचडी केलेल्या भ्रष्ट रत्नांनी शहरातील कोट्यावधी रुपये किंमतीच्या एक दोन नव्हे तर तब्बल ५२ एक्कर भुखंडाची चक्क सर्वे नंबर मध्ये अफरातफर करून विल्हेवाट लावली....वारे भ्रष्ट बहाद्दरांनों...अरे तुमच्या या कर्तृत्वाला तर तो धुळे जिल्हा परिषदेतील एकेकाळी भ्रष्टाचारात संपूर्ण राज्यात नावाजलेला धर्मभास्कर वाघ देखील चक्क स्वर्गातून सलामी ठोकत असेल.....

महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात कर्मचारी भरती प्रक्रिया थांबवली असतांना मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा आपणालि जास्त अधिकार असल्याच्या मग्रुरीत पुर्णा नगर परिषदेतील तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत नंदलाल चावरे,प्रशासकीय अधिकारी शेख इमरान,प्रशासकीय अधिकारी शेख बाबर या भ्रष्ठ सम्राट धर्मभास्करांच्या अवतारांनी चक्क जादुई कागदोपत्रांचा खेळ खेळीत लाखो रुपयांची देवाणघेवाण करीत तिन ते चार कर्मचाऱ्यांची भरती करून राज्यातील कर्मचारी भरती प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखवण्याचा पराक्रम केल्यामुळे या भ्रष्ट सम्राट धर्मभास्कराच्या अवतारांना व कुठलीही चौकशी न करता त्यांच्या एक नव्हे तर अनेक दुष्कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासकांसह मुख्याधिकारी अजय नरळे यांना देखील महाराष्ट्र शासनाने पद्मभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रपती महोदयांकडे शिफारस करावी अशी खोचक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

💥यालाच तर म्हणतात 'चोर चोर मौसेरे भाई भ्रष्टाचार से मिली हर्राम की कमाई सभीने मिलबाटकर खाई' :-

शहरातील विविध भागात कोट्यावधी रुपयांची निकृष्ट दर्जाची अर्थात दर्जाहीन बोगस कामे,नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या शिक्क्यांचा तसेच बोगस स्वाक्षरीचा वापर करून मालमत्ता नामांतर/हस्तांतरासह शेकडो बोगस बांधकाम मजूर अनुभव प्रमाणपत्रांचे वाटप,नगर परिषदेतील लाखो रुपयांच्या भंगारासह फर्निचरची परस्पर विक्री,जाहिरातीच्या नावावर लाखो रुपयांची मनमानी पध्दतीने उधळन,प्रधानमंत्री आवास योजनेत/रमाई घरकूल योजनेत/स्वच्छ भारत अभियान योजनेत अफरातफर,एकाच प्रभागात रस्ते नाल्याची नाव बदलून त्याच त्याच झालेल्या कामांवर अनेकदा विकासकाम दाखवून कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीचा अपहार अन् त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे चार बोगस कर्मचारी भरती प्रकरण अशी अनेक प्रकरण उघडकीस आल्यानंतर देखील संबंधित भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पापांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोईस्कररित्या पांघरूण टाकल्या जात असेल तर त्यांची हिंमत तर वाढणारच ना ? यालाच तर म्हणतात 'चोर चोर मौसेरे भाई भ्रष्टाचार से मिली हर्राम की कमाई सभीने मिलबाटकर खाई' 

पुर्णा नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी भ्रष्ट कारभारात अक्षरशः सुद सोडल्याचे निदर्शनास येत असून संबंधित भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर राज्यातील धुळे जिल्हा परिषदेत गाजलेल्या भ्रष्ट सम्राट धर्मभास्कर वाघाचे भुत बसले की काय असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे धुळे जिल्हा परिषदेत गाजलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात एकमेव भास्कर वाघ याचे नाव समोर आले होते परंतु एक नव्हे अनेक प्रती भास्कर वाघ निर्माण होतांना दिसत असून यास सर्वस्वी वरिष्ठ अधिकारी आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे भ्रष्ट लोकप्रतिनिधीच जवाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या