💥पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन लिखाण करणाऱ्या युवतीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली💥
जिंतूर प्रतिनीधी / बी.डी.रामपूरकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियात लिखाण केल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे, त्या अनुसंघाने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला दि. १५ मे रोजी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन लिखाण करणाऱ्या युवतीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात गरळ ओकत अभिनेत्री केतकी चितळे यानी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्याच्या भावना दुखावल्या आहे म्हणून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. या निवेदन परभणी जिल्हा अध्यक्षा प्रेक्षाताई विजयराव भांबळे, रामराव उबाळे, बाळासाहेब , पठाण उस्मानखान, अक्कुलाला, जाधव, शामसुंदर, पठाण दसमीर खान से अहेमद बागवान, मिर्झा शाहेद बेग, डोईफोडे मनोहर , उमाळे (बंटी निकाळजे चंद्रकात बहिरट सोहेल अहेमद, जानेमिया हरभरे ताई,श्रद्धा पवार, आदींसह अनेक मंडळी उपस्थित होते....
0 टिप्पण्या