💥अधिकाऱ्यांना धारेवर धरताच जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत उपलब्ध झाला रक्तसाठा....!


💥सखाराम बोबडे पडेगावकर यानी केला पाठपुरावा💥

गंगाखेड (दि.०७ मे २०२२) :- पाच दिवसाच्या जन्मलेल्या बाळासाठी A निगेटिव्ह रक्ताच्या प्लाजमा उपलब्ध  नसल्याने ब्लड बँकेतील अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी मोबाईलद्वारे जाब विचारताच दुसरेच दिवशी रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतः मेसेज करून कळवली.

पाच दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला A निगेटीव्ह पाल्झमा उपलब्ध होत नसल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळाली. यावरून त्यांनी प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेत धाव घेतली. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी या गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले. रक्तपेढीच्या प्रमुख अधिकारी राठोड मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हा रक्तगट उपलब्ध असून याची आमच्याकडे मागणीही आली नसल्याचे सांगितले. हा रक्तगट आपल्याकडे का उपलब्ध नाही ? उपलब्ध नसल्याचे आपण वरिष्ठांना लेखी कळवले का ? का कळवले नाही ? असे प्रश्न विचारताच त्या निरुत्तर झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांचे कार्यालय गाठले असता ते कार्यालयात हजर नव्हता.जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे ह त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून हा रक्त साठा तात्काळ उपलब्ध करावा असे सुचवले. यावरून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा रक्तसाठा जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती नागरगोजे यांनी एसएमएस व्दारे  सखाराम बोबडे पडेगावकर यांना दिली. आगामी काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य संचालक व आरोग्य मंत्र्यांशी  पाठपुरवा करणार असल्याचे बोबडे यांनी सांगीतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या