💥जिंतूर येथील येलदरी रोडवर मालकीच्या जागेवरून दोन गटात बाचाबाची पोलिसांनी मध्यस्थी करून वाद निवळला...!


💥बाधकामा साठी दगड रोडवर टाकले त्या नंतर तिथं तणावाचे वातावरण निर्माण झाले💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

          येलदरी रोडवर मालकीच्या जागेवरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर चागलाच तणाव निर्माण झाला, पोलिसांनी मध्यस्थीने प्रकरण शांत केले. परिसरात चागलेच तणावा पाहावयास मिळाले.

           छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील जागेवरून दोन गटात बाचाबाची झाली, बाधकामा साठी दगड रोडवर टाकले त्या नंतर तिथं तणावाचे वातावरण निर्माण झाले लगेच पोलीसांनी येऊन वाद निवळला. त्या ठिकाणी पो नि शिंदे,उपविभागीय अधिकारी बोफने यांनी तिथे भेट दिली. दुपार पर्यंत रोडवर पोलीस छावणीचे स्वरूप दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या