💥सतिश सातोनकर लिखीत "गोफणगुंडा" हे पुस्तक कर्मयोगी दिवाकर रावजी रावते यांच्या जीवनावर आधारित💥
परभणी (दि.१० मे २०२२) - परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आज मंगळवार दि.१० मे २०२२ रोजी विद्यापीठ संशोधन प्रदर्शनीला भेट देण्यासाठी आपल्या सहकारी मंत्री महोदया बरोबर आलेले राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे आले असता 'गोफनगुंडा' या पुस्तकाचे लेखक तथा राजकीय प्रसिध्द विश्लेषक सतिश सातोनकर यांची कन्या कु.खुशी सतीश सातोनकर यांनी आपल्याजवळ असलेले कर्मयोगी दिवाकर रावजी रावते यांच्या जीवनावर आधारित "गोफणगुंडा" हे पुस्तक आदित्य ठाकरे यांना भेट म्हणून दिले.
यावेळी कु.खुशी सातोनकर यांनी गोफनगुंडा या पुस्तकाबद्दलची संपूर्ण माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुस्तक निरखून बघीतले व यावेळी पुस्तकाचे कौतुकही केले यावेळी मंत्री महोदयांनी आपल्या इतर सहकार्यांसाठी या गोफनगुंडा या पुस्तकाच्या कॉपी देखील मागवल्या परंतु उपलब्ध नसल्यामुळे आदित्य साहेबांच्या सहकारी मंत्री महोदयांना त्या देता आल्या नाही...
0 टिप्पण्या