💥पुर्णा तालुक्यातील माखणी जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...!


💥महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करून ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रंजित आवरगंड यांचे हस्ते संपन्न💥

पुर्णा (दि.०१ मे) - तालुक्याती माखणी जिल्हा परिषद शाळेत रविवार आज दि.०१ मे रोजी महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा झाला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करून ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष .रंजित आवरगंड यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक .संजयकुमार जोशी सर यांनी केले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थीनी श्रद्धा आवरगंड, सीतल आवरगंड अपूर्वा आवरगंड, श्रद्धा अनुरथ आवरगंड यांनी समोचित भाषणे केली.गावचे सरपंच गोविंदआवरगंड यांनी शाळेच्या विकासात कुठलीही कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.


त्यानी दुरुस्तीला आलेल्या सर्व इमारती 15 ऑगस्ट पर्यंत दुरुस्त केल्या जातील अशी ग्वाही दिली.यानंतर विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी सोहम आवरगंड मीलीद गाडे सीनेहल आवरगंड  बक्षीस वाटप करण्यात आले.वर्ग 4थीच्या विद्यार्थ्यांनी सीतल आवरगंड श्रधा आवरगंड यांनी ईग्रजी संवाद सादर केले.त्यानंतर  प्रगतीशील शेतकरी तथा पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.गावातील शिक्षणप्रेमी युवक नवनाथ आवरगंड यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.अशारीतीने विविध उपक्रमांनी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला.या कार्यक्राचे सुत्रसंचालन . श्री गजानन पवार सर ,तर आभार प्रदर्शन श्री.राजकुमार ढगे सर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक श्री.सुरज पौळ,श्री.शेळके सर,श्री.महाजन सर व सौ झटे मँडम यानी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या