💥"मेरा बुथ सबसे मजबूत" ही संकल्पना यशाचे गमक : भाजप बैठकीत आ.मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केले मत....!


💥भाजपच्या बूथ प्रमुख व शक्ती प्रमुखांच्या बैठकीस प्रतिसाद💥

जिंतूर प्रतिनिधी- बी.डी.रामपूरकर

जिंतुर (दि.१२ मे २०१२) - मेरा बुथ सबसे मजबूत हीच संकल्पना भाजपच्या यशाचे गमक असल्याचे मत आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले.आज शहरात आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ प्रमुख व शक्ती प्रमुखाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

  त्यांनी पुढे असेही सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत साठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्या सह बूथ प्रमुख व शक्ती प्रमुखांनी सज्ज राहावे असे आव्हान केले. या झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले विचार व अडीअडचणी विषद केल्या.आमदार मेघना बोर्डीकरांनी या बैठकीत सांगितले की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मेरा बुथ सबसे मजबूत या अभियान अंतर्गत या पुढेही पक्षाची वाटचाल सुरू राहणार असून या पूर्वी जे पक्षाने भरीव यश मिळवले ते फक्त बुथ प्रमुख व शक्ती प्रमुख यांच्यात राहिलेल्या योग्य समन्वया मुळे व मेरा बूथ सबसे मजबूत या पक्षाच्या अभियाना अंतर्गत सुरू ठेवलेल्या वाटचाली मुळे असे सांगितले.

  या पूर्वी संपन्न झालेल्या बूथ कमेटीच्या बैठकीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या हस्ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर निवडी घोषित केल्या.आज संपन्न झालेल्या बैठकीत मंचावर आमदार मेघना बोर्डीकर समवेत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे,लक्ष्मणराव बुधवंत, दत्ता कटारे,धरमचंद अच्छा, सुनील घुगे,मनोहर सातपुते,किशोर जाधव, सुयोग मुंढे,कृष्णा मोरे,विश्वनाथ राऊत,प्रमोद चव्हाण,भगवान वटाने,सह बहुसंख्य भाजप पदाधिकारी व बुथ प्रमुख व शक्ती प्रमुखा सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या