💥महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि अनुभव मंडपमसाठी निधी देणार - खासदार संजय जाधव


💥खा.जाधव हे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते💥

 परभणी - जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा परभणी शहरात तसेच जिल्ह्यात कोठेही पूर्णाकृती पुतळा नाही. याची खंत समाज बांधवांमध्ये असून, यासाठी आपण योगदान देऊ. तसेच महात्मा बसवेश्वरांनी उभारलेल्या अनुभव मंडपम सारखा सभाग्रह देखील उभारणीसाठी भरघोस निधी देवू, अशी ग्वाही सुद्धा खासदार संजय जाधव यांनी दिली. ते वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते. 

      येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज मंगळवार, 3 मे रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जगद्गुरु एकोरामाध्याय आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. मदन लांडगे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, प्रा.किरण सोनटक्के, उद्योजक अशोक सावरगावकर, प्रभाकर वाघिकर, प्राचार्य महेंद्र मोताफळे, पंडितअप्पा बरदाळे, दिलीपअप्पा वसमतकर, शिवराज बरडे, अरुण पेडगावकर, डॉ.आनेराव ,बालाजी आनेराव, नितीन सावंत, नितीन देशमुख, डॉ. सुनील जाधव, शंकर फुटके, गोविंद गिरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

   पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे काम केले. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य आता या काळातील समाज बांधवांनी एकत्र येऊन करणे आवश्यक आहे. त्यांच्या समता, बंधुता आणि प्रेम तसेच लोकशाहीच्या विचारांचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यांचे हे विचार नवीन पिढीत रुजवण्यासाठी जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी लिंगायत समाज बांधवांची असून,  त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक ते योगदान खासदार म्हणून मी देईल. याशिवाय महात्मा बसवेश्वर यांनी त्याकाळी उभारलेल्या अनुभव मंडपम सारखा सभागृह देखील उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊ, असे देखील आश्वासन खासदार संजय जाधव यांनी यावेळी दिले.

   याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी देखील आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.मदन लांडगे यांनी केले. सूत्रसंचलन महेश स्वामी तर आभार डॉ.गोविंद कामटे यांनी मानले. या कार्यक्रमास 

प्रतिष्ठाणचे सोमेश्वर लाहोरकर, महेश स्वामी, विठ्ठल रणबावरे, शिवाजी वाकोडे, मधुकर स्वामी, वीरभ्रद मठपती, सदानंद उबाळे, निवृत्ती रेखडगेवाड, विश्वबर रसाळ, प्रभाकर खानापुरे, वैभव पत्रे, दिपक बीडकर, नितीन जाधव, प्रल्हाद वनगुजरे, विनायक भोजने,

महेंद्र लांडगे, शिवचरण बीडकर, विठ्ठल दामोधर, दिपक, बीडकर, संजय फुलझळके, स्पदन देवडे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या