💥पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथील नियमबाह्य रेती उत्खनन प्रकरण....!


💥महसुल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करणार💥  

💥असा इशारा उद्धव कामाजी ढवळे,संजय झाकने यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला इशारा💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.११ मे २०२२) :- तालुक्यातील डाकूपिंप्री येथील नियमबाह्य अवैद्य पणे वाळू उपसली जात आहे. गौण खनिज अधिनियम आणि प्रशासकियदृष्ट्या अत्यंत गंभीर बाब असल्याने याची त्वरीत दखल घ्यावी. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल मूद गोयल , पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार सौ. सुमन मोरे, लिलावधारक मोहम्मद मुन्तजिब खान वहीद खान परभणी शासनाच्या नियम अटींचा भंग केला आहे. लिलाव धारकास पाठीशी घालत असल्याप्रकरणी महसुलच्या अधिकारी कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करून नियमबाहय मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रेती/वाळुचे उत्खनन वाहतुक केल्या प्रकरणी लिलावधारक मो. मुन्तजिद खान यांच्यावर गुन्हा नोंद करून दंडात्मक कार्यवाही करून परवाना रद्द करावा अन्यथा दि.१८ मे  रोजी साडेबारा वाजता आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा उद्धव कामाजी ढवळे,संजय झाकने यांनी उपविभागिय अधिकारी पाथरी यांना निवेदनाव्दारे दिला आहे. त्याच बरोबर आत्मदहन केल्यानंतरची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित एजन्सीधारकावर राहील, याची नोंद घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या