💥शहरातील मुख्य व्यापारपेठेसह उच्चभ्रू वसाहतींमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या तळीरामांमुळे व्यापाऱ्यांसह नागरीकही त्रस्त💥
पुर्णा : अगदी शुल्लक कारणावरून देखील काही क्षणातच तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणाऱ्या या शहराला सर्वात मोठा श्राप शहरातील असंख्य बिअरबार रेस्टॉरंट,बिअर शॉपी,देशी-विदेशी दारू दुकान तसेच देशी अड्डे ठरत असून अगदी भर वसाहतींमध्ये असलेल्या या दारूंच्या दुकानांतून यथेच्छ दारू ढोसून निघालेल्या तळीरामांच्या टोळ्या आपआपसात वाद घालता घालता केव्हा एखाद्या व्यापाऱ्याला किंवा प्रतिष्ठित नागरीकाला लक्ष बनवून त्याच्यावर तुटून पडतील याचा नेम नाही परंतु या शहरात व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिकांना कोणीही वाली राहिलेला नसून गुन्हेगार अपप्रवृत्तींसह तळीरामांच्या हाकेला हाक देऊन त्याच्या बचावासाठी धावून येणारे गुंडपाळ तिनपाट पुढारी क्षणात धावून येऊन त्यांचा बचाव करतात परंतु व्यापारी प्रतिष्ठांची नाव मात्र सार्वजनिक ठिकाणी दंगल घडवून दहशत निर्माण केल्याचा ठपका ठेवून जाणीवपूर्वक गोवली जातात यालाच तर म्हणताच 'चोर सोडून संन्याश्याच्या गळ्याला गळफास'
शहरातील महाविर नगर,बसस्थानकरोड सुमन मंगल कार्यालय परिसर,जुना मोंढा परिसर,शनी मंदिर भगवान महाविर मंदिर परिसर रेल्वे स्थानक परिसरासह मुख्य बाजारपेठेतील स्वामी दयानंद सरस्वती चौक,लोकमान्य टिळकरोड या उच्चभ्रू वसाहतीतील देशी दारू अड्डे वाईन शॉपसह परिसरातून विकल्या जाणाऱ्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीला भल्या पहाटे सुरूवात होत असल्यामुळे परिसरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांना 'शराबी' सिनेमाची प्रत्यक्ष रंगीत तालीम या परिसरात पाहावयास तर मिळतेच याशिवाय तळीरामांसाठी शंभर/दोनशे रुपयांची चिल्लर देखील करून ठेवावी लागते...कधी प्रेमाने तर कधी भाईगीरी करीत दहा/विस/तिस रुपयांची वसूली हे तळीराम व्यापाऱ्यांकडून करतात एखाद्या वेळेस अगदी धुमाकूळ घालीत परिसरातील दुकानांच्या शटरवर दुकानातील सामानांवर लात्या घालीत दहशत सुध्दा निर्माण करतात पोलिस प्रशासनाने शहरातील विविध भागात बसवलेल्या सिसीटीव्ही कॕमेऱ्यांची तर त्यांना यत्किंचितही भिती वाटत नाही कारण पोटात बया गेल्यानंतर शराबी सिनेमातील अमिताब बच्चन देखील यांच्या पुढे अगदी फिक्का पडतो कारण यांची मस्ती जिरवायची हिम्मतच कोणी दाखवत नाही पोलिस प्रशासनाला देखील वाटते उगाच डोक्याला ताण नको पिण्याच्या नशेत काही बरे वाईट झाले तर उगाच डोकेदुखी त्यामुळे शहरात सर्वत्र तळीरामांचे साम्राज्या निर्माण झाल्याचे दिसत आहे .
शहरातील बिअरबार रेस्टॉरंट/देशी-विदेशी दारू दुकान,देशी दारू अड्डे तसेच अवैध देशी-विदेशी दारू विक्रेते धाबे चालकांकडे दिवसातून चोवीस तास दारू उपबध होत असल्यामुळे संपूर्ण शहरासह तालुक्यात तळीरामांचा धुमाकूळ वाढत असल्याचे निदर्शनास येत असून स्थानिक पोलिस प्रशासनासह जिल्ह्यातील दारू बंदी विभागाचे अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.....
0 टिप्पण्या