💥पुर्णा-नांदेड राज्यमार्गासह पुर्णा-ताडकळस मार्गावर वैद्य/अवैध मद्य विक्री बेभान ; अपघातांचे वाढले प्रमाण....!


💥धाबे/रेस्टॉरंट मध्ये खुलेआम दारूची विक्री ; ताडकळस रस्त्यावरील देशी दारूअड्डा ठरतोय मद्यपींसाठी मनुष्य जिवण मुक्ती केंद्र💥

पुर्णा (दि.१० मे २०२२) - तालुक्यातील राज्य महामार्गांवर हल्ली अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसत असून काही अपघात सुसाट वेगाने वाहन पळवणाऱ्या बेजवाबदार वाहन चालकांमुळे तर बरेच अपघात राज्य महामार्गावर रेस्टॉरंट/धाब्याच्या आड चालणाऱ्या अवैध देशी विदेशी दारू विक्री मुळे होत असल्याचे ही निदर्शनास येत आहे.

तालुक्यातील राज्य महामार्गांवर धाबे/रेस्टॉरंटच्या नावाखाली बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात खुलेआम देशी-विदेशी दारूची होणारी विक्री अपघातांसह जिवघेण्या वादांना निमंत्रण देत असतांना जिल्ह्यातील दारू बंदी विभागातील अधिकारी/कर्मचारी संबंधित अवैध मद्य विक्रेत्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत आपले उकक्कळ पांढरे करून घेतांना दिसत आहेत.

याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे पुर्णा ताडकळस मार्गावरील पंचायत समिती,शासकीय ग्रामीण रुग्नालय,न्यायालय,तहसिल कार्यालय,महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालय आदी महत्वाच्या शासकीय कार्यालयांसह याच राज्य महामार्गावर बळीराजा साखर कारखाना असतांना भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड करून शासकीय ग्रामीण रुग्नालया लगतच शासनमान्य देशी दारू दुकानाला परवानगी देऊन या राज्य महामार्गावर अपघातांना जनुकाही अधिकृत परवानाच बहाल केल्याचे निदर्शनास येत असून संबंधित देशी दारू दुकानामुळे आतापर्यंत अनेक जनांना आपले प्राण गमवावे लागले आहेत कारण या देशी दारू दुकानातून यथेच्छ दारू ढोसून निघालेले मद्यपी वेगाने बाहेर निघतांना पुर्णा-ताडकळस मार्गावरून धावणाऱ्या वाहनांखाली येऊन आपले प्राण गमावत असल्यामुळे सदरील देशी दारू दुकान व्यसनाधीन मद्यपींसाठी अक्षरशः 'मनुष्य जिवण तात्काळ मुक्ती केंद्र' बनल्याचे दिसत आहे.

पुर्णा-नांदेड,पुर्णा-ताडकळस राज्य महामार्गांवरील रेस्टॉरंट/खानावळ (धाबे) देशी दारू दुकान या मार्गावरून धावणाऱ्या व्यसनाधीन वाहन चालकांसाठी अक्षरशः इंद्र दरबारा समान झाल्याने व्यसनाधीन वाहन चालक या मार्गांवरून नशेत सुसाट वेगाने वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देतांना दिसत असून या मार्गावरील गौर-चुडावा-नरापूर या गावांमधील नागरिकांना परिसरातील शेतकऱ्यांना या सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे आपला जिव अक्षरशः मुठ्ठीत घेऊन या रस्त्याने मार्गाक्रमण करण्यासह या मार्गांना ओलांडून आपआपल्या शेतांमध्ये जावे लागत आहे.

पुर्णा-चुडावा-नांदेड मार्गावरील गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालय/महाविद्यालय याच मार्गावर असल्यामुळे या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्द्यार्थ्यांच्या जिविताला सुध्दा सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे धोका निर्माण झाला असून या मार्गावरील गावांसह शाळेच्या ठिकाणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ स्पिडब्रेकरची व्यवस्था करावी अशी मागणी या गावांतील नागरिकांकडून होत आहे दरम्यान जिल्ह्यातील दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून या मार्गांवरील खानावळ/धाबे/रेस्टॉरंट मधून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध देशी विदेशी दारू विक्रीला तात्काळ लगाम लावण्याच्या दृष्टीने पावल टाकावी व पुर्णा-ताडकळस मार्गावरील देशी दारू दुकान तात्काळ भागातून हटवावे अशी मागणी होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या