💥नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड कायद्या मधील कलम आकराचे संशोधन रद्द करा..!


💥राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांना स.हरप्रीतसिंघ उर्फ लखनसिंघ लांगरी यांनी दिले निवेदन💥

नांदेड (दि.16 मे 2022) : येथील धार्मिक संस्था गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डच्या कायदा 1956 मधील कलम 11 मध्ये केलेले मागील संशोधन रद्द करावे या मागणीचे निवेदन स. हरप्रीतसिंघ उर्फ लखनसिंघ लांगरी यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांना सादर केले. 

शनिवार, दि. 14 मे रोजी राज्यसभा सदस्य शरदचंद्र पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता स. हरप्रीतसिंघ लांगरी यांनी त्यांना निवेदन देऊन गुरुद्वारा बोर्डाच्या कायदा 1956 मध्ये  वर्ष 2015 मध्ये मागील शासनाने केलेले कलम आकरा मधील संशोधन रद्द करण्याची मागणी केली. निवेदनात पुढे म्हंटलं आहे की, स्थानीक शीख समाजात वरील विषयी मोठी नाराजी आहे. गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त अध्यक्ष नियुक्तीचा विषय अन्यायकारक आहे. अनेक वेळा आंदोलन करून देखील वरील विषयी पाऊल उचलले जात नाही आहे. म्हणून गुरुद्वारा बोर्डाचा विषय त्वरित मार्गी लावावा अशी मागणी प्रस्तुत निवेदनात करण्यात आलेली आहे. वरील निवेदनाची प्रत मा. महसूल मंत्री मा. बाळासाहब थोरात यांनाही पाठविण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या