💥जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील दलित बांधवांनी स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा दिला इशारा....!


💥पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

आडगाव बाजार - स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे जिंतूर तालूक्यातील आडगाव बाजार येथिल दलित बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाकडे रस्ता व नालीसाठी येथिल दलित बांधवांनी वांरवार मागणी केली परंतु दलित बांधवांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे दलित बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या दलित बांधवांनी जिंतूर येथिल गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित रस्ता व नालीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामपंचायत कार्यालय आडगावबाजार समोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर दिपक ठोके,बबन ठोके,दिनकर ठोके,मंचक ठोके,नामदेव ठोके यांच्या स्वाक्षरी आहेत.....

छायाचित्र ; संग्रहीत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या