💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगांव तालुक्यातील येलदरी-सेनगांव रस्त्यावर वन्य प्राण्याला वाचवतांना कारचा अपघात....!


💥येलदरी-सेनगांव रस्त्यावरील भंडारी पाटी जवळील घटना💥


शिवशंकर निरगुडे ;  हिंगोली प्रतिनिधी 

सेनगांव तालुक्यातील येलदरी-सेनगांव रस्त्यावरील भंडारी पाटी जवळ रात्रीच्या सुमारास रोही या वन्य प्राण्याला  वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चार चाकी गाडीचा रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे.


सदर या चार चाकी गाडी मध्ये तीन प्रवाशी होते तर या अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाले आहेत.तर अपघातामध्ये गाडीचे देखील नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच आज दिनांक 24 /05/2022 वार मंगळवार रोजी घटनास्थळी सेनगांव पोलीस दाखल होऊन पाहणी केली.व तसेच आज रोडच्या कडेला पडलेली गाडी बाहेर काढण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सेनगांव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या