💥निझामाबाद-पुणे-दौंड-निझामाबाद व निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद डेमू पूर्ववत धावणार....!


💥मध्य रेल्वे विभागाने आषाढी एकादशी आणि प्रवाशांच्या विनंतीला लक्षात घेवून या गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला💥

पुर्णा (दि.१४ मे २०२२) - निझामाबाद-पुणे-दौंड-निझामाबाद आणि निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद डेमू गाड्या दिनांक 13/05/22 ते  29/05/22 या कालावधी दरम्यान 17 दिवस रद्द केल्याचे कळविले होते.


परंतु  मध्य रेल्वे, सोपालूर विभागाने आषाढी एकादशी आणि प्रवाशांच्या विनंती ला लक्षात घेवून  या दोन्ही गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे. दिनांक 13/05/22 ते  29/05/22 या कालावधीत या दोन्ही गाड्या नियमित धावतील निझामाबाद–पंढरपूर-निझामाबाद डेमू ही गाडी दिनांक 13/05/22 ते  29/05/22 या  कालावधीत ठरलेल्या मार्गाने नियमित धावेल दिनांक 13/05/22 ते  29/05/22 या कालावधीत दौंड-निझामाबाद डेमू हि गाडी दौंड रेल्वे स्थानकावरून न सुटता दौंड कोर्ड लाईन या स्थानकावरून सुटेल निझामाबाद-पुणे डेमू हि गाडी दौंड रेल्वे स्थानक मार्गे न धावता तिचा मार्ग बदलून दौंड कोर्ड लाईन मार्गे धावेल प्रवाशांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन रेल्वे प्रशासनाने कळविले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या