💥पुर्णा तालुक्यातील रेती घाट लिलाव धारकांनी मांडला सर्वत्र अतिरेकी उच्छाद ; महसुल प्रशासनाचे नियम टांगले वेशीवर...!


💥तालुक्यातील सर्वच रेती घाट लिलावधारकांनी जेसीबी मशीनद्वारे ठराविक साठ्यापेक्षा जास्त केले अवैध रेती उत्खनन💥

[रेती घाट परिसरातील गायरान जमिनींसह खाजगी शेत शिवारात ही हजारो ब्रास रेतीची ढिगार ; रेती साठविण्याच्या स्पर्धांना सूरूवात]

परभणी/पुर्णा (दि.०५ मे २०२२) : परभणी जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महसुल प्रशासनाच्या अनियंत्रित कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यात 'आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय' असा एकंदर कारभार झाल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी-पुर्णा नद्यांवरील काही रेती घाटांचा लिलाव फेब्रुवारी महिण्यात तर काही रेती घाटांचा लिलाव नुकताच झाला असून संबंधित रेती घाट लिलावावेळी रेती घाट लिलावधारकांना ठरवुन दिलेल्या नियम व अटींची महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मुकसंमतीने पायमल्ली करीत वाहणार्‍या रेती घाट लिलावधारकांनी पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील ठराविक क्षेत्रासह आसपासच्या संपूर्ण परिसराचा बेकायदेशीररित्या ताबा मिळवत अहोरात्र जेसीबी मशीनच्या साहाय्याने पुर्णा-गोदावरी नदीपात्रांना अक्षरशः खरडण्यास सुरूवात केल्यामुळे भविष्यात पर्यावरणासह कृषी क्षेत्रालाही भयावह धोका निर्माण झाला असून यात संपूर्ण जिल्ह्यात पुर्णा तालुका आघाडीवर आहे.

पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरीसह दुधना नदीच्या पात्रातून वाळू माफियांनी असंख्य जेसीबी मशीनींच्या साहाय्याने अहोरात्र प्रचंड प्रमाणात रेतीचे उत्खनन या अवैध चोरट्या रेतीची शेकडो टिप्पर/हायवा/ट्रेक्टरद्वारे वाहतूकीसह परिसरात ही शासकीय गायरान जमिनींचा तसेच खाजगी शेत शिवारात साठे केल्याचे निदर्शनास येत असतांना स्थानिक तहसिलदार/महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी रेती घाट लिलावधारक/रेती तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासत शासकीय गौण-खनिज रेतीची खुलेआम विल्हेवाट लावीत असंतांना उपविभागी अधिकारी सुधीर पाटील कुठल्याही ॲक्शन मोड मध्ये येतांना दिसत नसल्यामुळे या सर्व गंभीर प्रकाराला त्यांची सुध्दा संमतीच असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील कानखेड,पिंपळगाव बाळापूर,संदलापूर ही रेतीघाट यापुर्वीच फेब्रुवारी महिण्यात सुरू झालेली असून संबंधित रेती घाट लिलावधारकांनी महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम अटींना बगल देत आपआपल्या रेती घाटांवरील ठराविक क्षेत्रासह परिसरात ही घुसखोरी करीत लिलावातील ठराविक रेती साठ्याच्या हजारो ब्रास रेतीचे रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने उत्खनन करून अक्षरशः नदीपात्रांवर वाजतगाजत दरोडे घालण्याचा गंभीर प्रकार चालवला असतांना स्थानिक महसुल प्रशासनासह जिल्हा महसुल प्रशासन संबंधित रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी करून रेती घाट लिलावधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यास का टाळाटाळ करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यात सर्वत्र शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे.

  तालुक्यातील पुर्णा नदी पात्रातील कानखेड रेती घाट लिलावधारक अनिल अग्रवाल,पिंपळगाव बाळापूर लिलावधारक प्रसाद पांचाळ,संदलापूर रेती घाट लिलावधारक सुदाम लक्ष्मण माने या रेती घाट लिलावधारकांनी महसुल प्रशासनाच्या नियमांवर अक्षरशः लघुशंका करीत अतिरेकी कारभाराला सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असून ठराविक रेतीसाठ्याच्या हजारोपट रेतीचे जेसीबी यंत्राद्वारे उत्खनन करून सदरील अवैध चोरट्या रेतीची शेकडो वाहनांतून विल्हेवाट तर लावलीच आहे याशिवाय रेती घाट परिसरातील गावासह शेत शिवारात तसेच शासकीय गायरान जमिनींवर जागोजाग रेती साठ्यांचे डोंगर उभारल्याचे दिसत असून असाच भयावह कारभार नव्याने सुरूवात झालेल्या तालुक्यातील मौ.निळा,कान्हेगावसह अन्य रेती घाटांवरही होत असल्याचे दिसत असून मौ.निळा येथील रेती घाट लिलावधारकही अनिल अग्रवालच असल्यामुळे संबंधित रेती घाट लिलावधारकाला महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना कश्या पध्दतीने मेनेज करायचे व महसुल प्रशासनाचे नियम सोईस्कररित्या पायदळी तुडवायचे याचे भरपूर ज्ञान असल्यामूळे या रेती घाटावर देखील जेसीबु मशीनचा रात्रंदिवस वापर करीत नदीपात्रावर अक्षरशः बलात्कार होत असल्याचे निदर्शनास येत असून कान्हेगाव येथील रेती घाटावर देखील यापेक्षा वेगळे चित्र नसून या रेती घाटावर देखील जेसीबी मशनरीद्वारे रात्रंदिवस वाळूचा उपसा करण्यात येत असून पावसाळ्यापूर्वी हजारो/लाखो ब्रास रेती साठविण्याची तूफान स्पर्धा रेती घाट लिलावधारकांनी सुरु केली आहे....

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या