💥परभणी ते चौंडी विशेष बस सेवेसाठी विभागीय नियंत्रक यांना निवेदन....!


💥सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकर💥

गंगाखेड : 31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परभणी विभागाच्या प्रत्येक आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रक परभणी यांचेकडे एका निवेदनाद्वारे गुरूवारी करण्यात आली.

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त, अहिल्या प्रेमी जमा होतात. परभणी जिल्ह्यातूनही चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमिंची संख्या मोठी आहे . परभणी जिल्ह्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परभणी विभागाच्या प्रत्येक आगारातून म्हणजे गंगाखेड, पाथरी, शेलु जिंतूर ,परभणी वसमत ,कळमनुरी आणि हिंगोली या सर्व आगारातीतून बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मा जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यानाही या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या.  यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर यांचे सह ,ज्येष्ठ समाजसेवक विक्रम बाबा इमडे, धनगर साम्राज्य सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष रविकांत हारकळ, समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार दंडवते आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या