💥भक्तराम फड यांनी गेल्या आठ वर्षांपासून हे व्रत स्विकारले आहे💥
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. करोना संकटकाळात परिचारिका वर्गाने करोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा केली. त्यांच्या सेवा कार्याला प्रणाम. परळी तालुक्यातील भूमीपुत्र असलेल्या भक्तराम फड यांनी गेल्या आठ वर्षांपासून हे व्रत स्विकारले आहे.परिचारिका दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा सर्वांना प्रेरक ठरणारा आहे.
परळी तालुक्यातील भोजनकवाडी या गावाचे भक्तराम फड हे गेली आठ.वर्षे पुणे येथे परिचारीका म्हणून कर्तव्य बजावत आहेत.जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही.परिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र, तरीदेखील रुग्णसेवेला प्राधान्यक्रम देत त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत.
भक्तराम फड रा .भोजनकवाडी हे खेड्यातुन जावून गेली आठ वर्षे परिचारिका म्हणून आरोग्य सेवा बजावत आहेत. पिंपरी चिंचवड येथील डाँ.डि.वाय.पाटील हाँस्पिटल येथे कर्तव्य बजावत आहेत. कोवीड काळामध्ये परिचारिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आई, वडील, पती, मुले यांच्यापासून दूर राहून काम करावे लागले. समाजाकडून सुध्दा सुरवातीला उपेक्षा सहन करावी लागली. त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा तेवढाच धोका होता. ते सर्व सहन करून देशसेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांचा गौरव झाला पाहिजे. या बरोबरच शासकीय रुग्णालयात आजही परिचारिका कमी आहेत. त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात लवकरच परिचारिका भरती प्रक्रिया सुरू केली पाहिजे. यामुळे रुग्णांना सेवा सुलभ होईल. यासाठी ते लढा देत आहेत.महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.परळी तालुक्यातील या भूमीपुत्राने सेवेच्या या क्षेत्रात स्वतः ला वाहून घेतले आहे.नर्स डे च्या निमित्ताने त्यांच्या या कार्याला प्रणाम.तसेच महाराष्ट्रासह देशातील सर्व नर्सना हार्दिक शुभेच्छा....
0 टिप्पण्या