💥श्री संत शेगाव येथील संस्थानच सदस्य शिष्ट मंडळ पानकनेरगांवात दाखल : मूक्कामाच्या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी....!


💥तब्बल दोन वर्षानंतर गजानन महाराज पालखी येत असल्याने वारकर्यामध्ये उत्साहाचे वातावरण वारकरी लागले तयारीला💥 

 शिवशंकर निरगुडे ; हिंगोली प्रतिनिधी

विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारी व अश्वासह  पालखीचे प्रस्थान होणार असून वारकर्यांचे याकडे वेढ लागले आहे,


कोरोनाच्या जवळपास दोन वर्षांच्या संकटानंतर कमी झालेल्या कोरोना रूग्णसंख्येमुळे आषाढी पायी वारी होणार आहे कोरूना महामारी मुळे आषाढी वारीवर शासनाने बंदी घातली होती मात्र आता कोरोणा आटोक्यात आला असून सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे त्यामुळें येत्या जूनला संत गजानन महाराजांच्या पालखी माग्रस्थ  होणार आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहे

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी वारी झाली नव्हती. यंदा मात्र निर्बंध हटवल्याने दोन वर्ष कोराना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्र आपल्या पुर्वपदावर आला आहे. त्यांनंतर राज्यातील अनेक कार्यक्रम हे धुमधडाक्यात होत आहेत. आता सगळ्यांबरोबरच राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरच्या पायी वारीचे स्वप्न पुर्ण होणार आहे. येत्या जूनला संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे पंढरपूरकडे होणार आहे. यंदा प्रथमच श्री संत गजानन  महाराज पालखी सोहळा रंगणार असून धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम धुमधडाक्यात होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. तसेच पायी वारीची घोषणा झाल्याने वारकरी वारीच्या तयारीला लागले आहेत. 

तर यासंदर्भातील महत्वाची आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा व मुक्काम ठिकाणी सोय सूविधेच्या नियोजनासाठी  पालखीची गैरसोय होऊ नये यासाठी श्री संत गजानन महाराज शेगाव सदस्य  शिष्ट मंडळानी पानकनेरगांव येथे भैट देऊन पाहणी केली यावेळी प्रतिष्ठीत नागरिक कूलदिप देशमुख, शिवाजीराव देशमुख, शिवलिंग देशमाने भगवानराव देशमुख, गावातील भक्तगण उपस्थित होते

 महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे पंढरपूरकडे होणार असून रिसोड येथे मुक्काम असून दूपारी पानकनेरगांव येथे स्नेह भोजन साठी विश्रांति घेणार  असल्याचे सांगितले जाते प्रथमच दोन वर्षानंतर गजानन महाराज पालखी येत असल्याने सध्या पानकनेरगांव भागात भाविकामध्ये आनंदाचे वातावरण आहे वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून वारकरी गजानन महाराज गजरात जयघोष करत कोणताही भेदभाव न पाळता वारकारी चालतात. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आधीच वारकऱ्यांची तयारी सुरु असते. पण मात्रयानंतर कोरोणा व्हायरसच्या सावटामूळे पालखी सोहळा रद्द झाल्यामूळे वारकर्यांचा हिरमोड झाला होता.

सुखा लागी करीसी तळमळ। तरी तु पंढरीसी जाय एकवेळ॥ मग अवघाचि सुखरूप होसी। जन्मोजन्मीचे दुःख विसरशी॥ या अभंगाप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडोच्या संख्येने पायी चालत दींड्यामधून वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आपल्या लाडक्या सावळ्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी येतात. वर्षभर शेतात काम करुन अनेक वारकरी खास वारीसाठी १ महिणा जवळपास दिवस वेळ काढतात. सर्व देहभान विसरुन पंढरीच्या दिशेने वारकारी येतात. यात नोकरदार वर्ग सुद्धा मागे राहत नाही. अनेक नोकरदार खास वारीसाठी रजा टाकतात. वर्षभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून वारकरी गणगण गणात बोते जयघोष करत कोणताही भेदभाव न पाळता वारकारी चालतात. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आधीच वारकऱ्यांची तयारी सुरु असते. 

पंढरपूरमधील विठ्ठल मंदीर दोन वर्षापासून बंद होते त्यात यंदा वारी होणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला होता वारकऱ्यांची भावना....  सुख पाहिजे असेल तर एकदा पंढरीला गेले पाहिजे. पंढरीला गेल्यानंतर सर्व सुखच सुख मिळते. जन्मोजन्मीचे दुः ख नाहीसे होईल हे खरेच आहे. या सुखाची प्रचिती वारीत पंढरपूरातपर्यंत पायी चालत गेल्यानंतर येते. कामातला देव शोधण्यासाठी पायी चालत वारी करायची असते. वारकरी देखील याच देवाला शोधण्यासाठी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वारीत सामील होतात. आषाढी यात्रा सोहळ्यात सावळया विठ्ठलाच्या भक्‍तीरसात न्हाऊन गेलेले वारकरी टाळ मृंदगाच्या गजरात श्री संत गजानन महाराज यांच्या जयघोषात तल्‍लीन होतात. कोणताही भेदभाव यामध्ये केला जात नाही. सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये वारकरी म्हणून सहभागी होतात. आपली वारी सावळया विठुरायाच्या चरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांच्या मेळयाने अवघी पंढरी न्हाऊन जाते. खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताक्यांनी पंढरीतील रस्ते भगवे होतात. आणि टाळ, मृदंगाच्या निनादात गणगण बोते जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमला जातो. एक महिणा  दिवसाचा खडतर पायी प्रवास करून सावळया विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी सावळया विठ्ठलाला भेटून आंतरमनातून सुखावतो. विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी भक्‍त देहभान विसरून जातात. वारीमध्ये लीनतेची आणि समतेची भावना वारकर्‍यांच्या मनात असते. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक यात्रा भरतात पण ही पंढरीची आषाढी वारी ही एक अनोखी वारी आहे. या वारीमध्ये अनेक राज्यातील भाविक भक्‍त सामील होतात. अनेक जाती धर्माचे वारकरी, सामील होतात. या वारीमध्ये जात- पात- धर्म मानला जात नाही. लहान- थोर पुरूष भेद भाव केला जात नाही. उच्च नीच समजला जात नाही. सारेजण विठुरायाची लेकरेच आहेत असे मानले जाते. 

श्रींच्या पालखीचे हे ५४ वे वर्ष असून या पालखीसोबत जवळपास हजारो वारकरी पाचसे कि.मि वर प्रवास करतात राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचेही १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी कोरोणा काळ जर सोडला तर  परंपरा कायम आहे श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किमी आणि पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर असा एकूण १२७५ किलोमीटरचा हा प्रवास आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या