💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥
परभणी - परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने गवळी गल्ली मधील सुभाष रोड ते गौरक्षण या रोडचे सिमेंट काँक्रीट चा नवीन रोड करण्यात आला आहे. साधारणतः एक महिन्यापूर्वी करण्यात आलेला हा रस्ता पूर्णत: निकृष्ट दर्जाचा असून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर दहा दिवसातच या रोडवरील गिट्टी व रेती खुली झाली व रस्त्यावरती खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्या तयार केल्यानंतर दहा दिवसामध्येच रस्त्यासाठी वापरलेले मटेरियल गिट्टी व रेती उघडी पडली असेल तर त्या रस्त्याची गुणवत्ता तपासून त्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. परभणी शहरामध्ये महानगरपालिका अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या काही ठेकेदारांचे एक रॅकेट सक्रिय असून महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या आशिर्वादाने शासकीय विकास निधी चा दुरुपयोग करून बोगस व निकृष्ठ दर्जाचे काम करुन निधी लुटण्याचा प्रकार राजरोसपणे नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या राजाश्रयाखाली सुरु आहे. शहरामधील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून परभणी शहर महानगरपालिका मात्र शहरातील नागरीकांना वाऱ्यावर सोडून गुत्तेदारांना पोसण्यात व्यस्त आहे हि एक गंभीर बाब आहे.
करिता गवळी गल्ली येथील सुभाष रोड ते गोरक्षण या नव्याने झालेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची त्रयस्थ एजन्सी मार्फत गुणवत्ता तपासणी करून संबंधित कामावर लक्ष ठेवणारे अभियंते व निकृष्ठ दर्जाचे काम करणारे ठेकेदार यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना काळ्या यादीत टाकावे व संबंधित कामासाठी वितरीत होणारा शासकीय निधी तात्काळ थांबवावा या बाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
शहरात प्रशासनाच्या च लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने निकृष्ठ व बोगस काम करणाऱ्या काही ठराविक कंत्राटदारांचे रॅकेट उध्दवस्त करून परभणीतील नागरीकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व परभणी शहरातील जनतेला न्याय मिळवून द्यावा असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, धर्मेंद्र तुपसमिंद्रे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....
0 टिप्पण्या