💥पुर्णा नगर परिषदेतील लाखों रुपयांच्या भंगारासह फर्निचर संगणकांवर अक्षरशः काही कर्मचाऱ्यांनीच टाकला दरोडा ?💥

 


💥या प्रकरणी मुख्याधिकारी तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतील काय ?

पुर्णा : 'जगात जर्मनी भारतात परभणी अन् परभणीत अव्वल स्थानावर पुर्णा अन् इथ गिळायला काहीभी पुरना एकंदर अशी अवस्था येथील पुर्णा नगर परिषदेची झाली असून नगर परिषदेत कार्यरत भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचारी यांनी भ्रष्टाचारात अक्षरशः संपूर्ण राज्यात गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद घोटाळ्यातील धर्मभास्कर वाघ यांच्यावर सुध्दा कुरघोडी करण्याचा धाम निर्धार केला की काय ? असा प्रश्न उपस्थित होणारे अनेक घोटाळे उघडकुस येत असतांना वरिष्ठ अधिकारी मुग गिळून गप्प का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

पुर्णा नगर परिषदेच्या जुन्या इमारतीतील लाखो रुपयांच्या भंगारासह जुने फर्निचर खुर्च्या टेबल इलेक्ट्रिक पंखे टुबलाईटचे हजारो लोखंडी बॉक्स/पट्ट्या  इन्व्हेस्टर्सच्या तब्बल दहा बेटरी,तत्कालीन नगराध्यक्षा कुरेशी यांच्या काळातील सेतु सुविधा केंद्रातील सहा संगणक,स्टिलचे सोफासेट इत्यादीसह जुनी इमारत पाडण्यात आल्यानंतर निघालेले लाखो रुपयांचे लोखंडी भंगार अतिक्रमण हटाव मोहीमेतील लोखंडी टपऱ्या/पत्र जुने लाल ट्रेक्टर ट्राली,जुन्या ॲटो घंटागाड्या प्लास्टिक मुताऱ्यांसह लोखंडी मिक्सर नगर परिषद विश्रामगृहात ठेवण्यात आले तब्बर बारा चायनल गेट,पाडलेल्या जुन्या इमारतीचे सागवानी दरवाजे चौकटा गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहातील इलेक्ट्रिक पंखे खुर्च्या आदी लाखो रुपयांच्या साहित्यावर दस्तुरखुद्द नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनीच हात मारल्याचे दिसत असून यातील बरेच साहित्य काही कर्मचाऱ्यांच घरांमध्ये असल्याचे बोलले जात असून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळे यांना चौकशीसह कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश जारी करावे अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या