💥परभणी मनपाचा अनागोंदी कारभार : सिमेंट रस्त्यावर नियमबाह्य पध्दतीने डांबरीकरण कठोर कार्यवाही करण्याची मागणी...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधकारी आंचल गोयल यांच्या कडे मागणी💥


परभणी (दि.०५ मे २०२२) - परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने सध्या शहरामध्ये मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करणे चालू आहे. सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर डांबरी रस्ते बनविणे हे नियमबाह्य असून राज्य व केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन आहे शिवाय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशानिर्देशांचे हे उल्लंघन आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर केलेले डांबरीकरण हे टिकत नाही हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेले असल्याने सिमेंट काँक्रिट रस्त्यावरती फक्त सिमेंट काँक्रिटचेच रस्ते करावेत यावर डांबरी रस्ते करु नयेत असे स्पष्ट निर्देश असतानाही संपूर्ण नियम धाब्यावर बसवून परभणी शहर महानगरपालिका यंत्रणांनी ठरून दिलेल्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करत चुकीच्या पध्दतीने रस्ते तयार करीत आहे शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा पासून ते किंग कॉर्नर हा सिमेंट काँक्रिट रस्ता सुस्थितीत असताना त्यावरही तुरळक प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्याचे सोडून हा संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला त्या शिवाय शहरामधील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली असताना सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर डांबरीकरण करणे चालू आहे.


सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने डांबरीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या संबंधित परभणी शहर महानगर पालिका अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कार्यवाही करावी व संबंधित निधीचे वाटप तत्काळ थांबवावे या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरी रस्ते करु नयेत या राज्य शासन , केंद्र शासन व सुप्रीम कोर्टाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करून परभणी शहर महानगर पालिकेने शासकीय निधीचा व नियमित कर भरणा करणाऱ्या परभणीकर नागरिकांच्या रकमेचा गैरवापर केला आहे.  या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण तात्काळ एक चौकशी समिती स्थापन करून परभणी शहर नगरपालिकेने शासकीय रक्कमेचा गैरवापर करुन सिमेंट  काँक्रिट च्या रस्त्यावर डांबरी रस्ते नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांची चौकशी करावी व या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी , कर्मचाऱ्यांची व संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून संबंधित कामाच्या निधीचे वितरण तात्काळ थांबवावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व त्यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय व परभणी शहर महानगर पालिका प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, धर्मेंद्र तुपसमिंद्रे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या