💥राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरु...!


💥राज्य निवडणूक आयोगाने दि.०५ मे रोजी केले आदेश पारीत💥

परभणी (दि.०६ मे २०२२) : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने काल गुरुवार दि.०५ मे २०२२ रोजी रात्री प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरु केली आहे.

         सर्वोच्च न्यायालयाच्या ०४ मे रोजीच्या निर्णयाप्रमाणे ११ मार्च २०२२ रोजीच्या अधिनियमातील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी १० मार्च २०२२ रोजी असलेली प्रभाग रचनेची कारवाई ज्या टप्प्यावर होती, तीथपासून पुढे आयोगाने कारवाई चालूच ठेवावी. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचे कामकाज आयोगाद्वारे सुरु करण्यात आले आहे. नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे, जनगणनेची आकडेवारी लिंक करणे, या व्यतिरिक्त प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे, आकडेवारी, नकाशे वगैरे घेवून मुंबईत पाचारण केले आहे. परभणीतील अधिकार्‍यांना ८ मे २०२२ रोजी या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाकडे पाचारण करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या