💥पूर्णेत खरीप हंगामातील पेरणी पुर्वीच अन्नदाताता शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणूकीची रंगीत तालीम...!


💥कृषी विभागासह महसुल प्रशासनाचे नियोजन शुन्य : कृत्रिम टंचाई निर्माण करून बि-बियानांसह खतांची चढ्या भावाने विक्री💥


पुर्णा (विशेष वृत्त) - मान्सुन अर्थात पावसाळ्याला सुरूवात होण्यास तेरा दिवसाचा कालावधी बाकी असून येत्या ७ जुन २०२२ पुर्वी शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या पेरणीची जोरदार तय्यारी करीत असतांना प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी बि-बियान खत विक्रेत्यांकडून खतांसह बि-बियांणांचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून तसेच बोगस बि-बियानांची विक्री करून अन्नदात्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तालुक्यात सर्वत्र शेतकरी बांधवांकडून शेतांच्या नांगरणीला सुरूवात झाली असून पावसाला सुरूवात होताच खरीप हंगामातील सोयाबीन मुग उडी,हळद,कापुस आदी मुख्य पिकांच्या पेरणीच्या तयारीला शेतकरी लागला असतांना मात्र बि-बियान खत विक्रेत्यांनी देखील बि-बियानांसह खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांच्या आर्थिक मानसिक पिळवणूकीसाठी देखील कंबर कसल्याचे निदर्शनास येत असून मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी निकृष्ट दर्जाची बोगस बि-बियान विक्री होण्याची शक्यता असल्याने तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसुल प्रशासन पोलिस प्रशासनालाही सतर्क राहून शेतकऱ्यांना फसवणूकी पासून वाचवावे लागणार आहे.

शेतकऱ्यांना खरीफ हंगामातील पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खतांची देखील आवश्यकता भासते अश्या वेळी डीऐपी, २०:२०:००, १०:२६:२६,युरिया आदी खतांचा प्रचंड कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना ज्यादा दराने खतांची विक्री केली जाते अश्या वेळी खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाला कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारावा लागणार आहे खरीप हंगामातील पेरणीला अवघे काही दिवस बाकी असतांनाच सोयाबीन बियानांच्या किमती उच्यतम स्तरावर तर कापुस बियाणांचा प्रश्न गुलदस्त्यातच असल्याचे निदर्शनास येत असून तालुका कृषी विभागाचे या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या