💥साखरा येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कलशा रोहन निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह...!


💥पंचकोशीतील भावीक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान साखरा येथील ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

 मौजे साखरा येथे दि 06/05/2022 रोजी पासून हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह ला सुरुवात होते साखरा येथील हनुमान मंदिराचे काम आत्ता पूर्ण करण्यात आले आहें त्यानिमित्ताने हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कलश रोहन निमित्ताने साखरा येथे अखंड हरिनाम आयोजन करण्यात आले आहें या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4 ते 6 सहा काकडा आरती सकाळी 7ते 12 ज्ञानेश्वरी पारायन  दुपारी 1ते 5 भागवत कथा आणि संध्याकाळी 5 ते सहा हरिपाठ आणि संध्याकाळी रात्री 8ते 10 हरीकीर्तन होणार आहें दि .06/05/2022 ला माणिक महाराज दहेगावकर दि 07/05/ 2022 ला सोपान महाराज पोहूर दि 08/05/2022 मोहन महाराज गिरके लातूर .दि 09/05/2022 रोजी विठ्ठल महाराज जायभाये सोनपेढ  दि .10 /05/2022 सुरेश महाराज बोरखेडी 11/05/2022 नीळकंठ महाराज विभूते लातूर दि . 12 /05/2022 रोजी गजानन महाराज शास्त्री नगर दि 13/05/2022 रोजी संतोष महाराज वनवे बीड यांचे काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाची महापंगत होईल तरी पंचकोशीतील भावीक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान साखरा येथील ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहें 

साखरा येथील हनुमान मंदिराचे काम आत्ता पूर्ण पणे फार पडले आहें हें 71 फूट उंच करण्यात आले आहें आज साखरा येथे 71 फूट उंच मंदिरावर 71 किलो वजनाचा कलश आणण्यात आला हा कलश अंदाजे 150000 किमतीचा आहें कळशाचे साखरा नगरीत आगमन  होताच आनंदात बैलगाडीतून साखरा फाटा ते मारोती मंदिर पर्यन्त टाळ मृदूगाच्या गजराणे वाजता गाजत मारोती मंदिर पर्यंत कलश नेण्यात आला आहें या मंदिराचे काम साखरा येथील व्यापारी संदीपआप्पा चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहें या मंदिराला आणि सभामंडपाचे कामासाठी अंदाजे 15 लाख रुपये खर्च झाला आहें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या