💥ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेवर पत्रकारांचा आमदार पाठवण्याची मागणी....!


💥शिर्डी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे अधिवेशनाचे सूप वाजले💥  

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

महाराष्ट्र पत्रकार संघांचे 18 वे अधिवेशन शिर्डीत संपन्न झाले या अधिवेशनात ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांचा आमदार असावा  असा ठरावच परभणी जिल्ह्यातील पत्रकारांनी मांडला  यावेळी डिजिटल मीडिया बाबत माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. भाऊसाहेब वाघचौरे,  संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर  व वृत्तनिवेदक तथा भाजपाचे प्रवक्ते अजय चव्हाण व सुनील ढेपे पुणे लाईव्ह चे संपादक सह अनेक मान्यवर उपस्थित राहुन मोलाचे मार्गदर्शन केले.



शिर्डी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे १८वे अधिवेशन घेण्यात आले होते या अधिवेशन ला महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून अनेक पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवर यांनी  मत मांडताना महाराष्ट्र पत्रकारुउ संघ चांगले काम करत असुन ग्रामीण भागातील पत्रकारांना  न्याय मिळण्यासाठी पत्रकारांचा विधानपरिषदेत आमदार व्हायला पाहिजे असे मत शिर्डी येथील महाराष्ट्र पत्रकार संघ अधिवेशन मध्ये परभणी जिल्हाध्यक्ष प्रदिप कोकडवार यांनी विषय मांडला, या अधिवेशन मध्ये डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक व  डिजिटल मीडिया हे काळाची गरज असून पत्रकारांनी डिजिटल होण्याची सुरुवात करावी व प्रतिनिधी कसा असावा आम्हा प्रतिनिधीने कोणत्या विषयाची बारकाई ठेवायला पाहिजे आपल्याकडे काही तरी पुरावा पाहिजे डिजिटल मीडियात बाईट ला महत्व असून ती अवश्य घ्यावी असे मत राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी मार्गदर्शन केले इतर सर्व प्रकारची माहिती या अधिवेशन मध्ये देण्यात आली. 

बाबासाहेब राशीनकर यांनी उत्तम व्यवस्था केली तर राज्यभरातून परभणी जिल्ह्यासह अनेक जिल्हा अध्यक्ष पत्रकार प्रतिनिधीउपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या