💥अथक परिश्रमाने अखेर गाय आणी वळुला वाचवन्यास बचाव पथकाला यश....!


💥विहीरीत पडलेल्या गाय आणी वळुला बाहेर काढुन वाचवण्यात यश💥 


फुलचंद भगत

मंगरुळपीर :-शहरातील एका खाजगीच्या छोट्याशा विहीरीत गाय आणी एक वळु पडले होते.या घटनेची माहीती मिळताच संत गाडगेबाबा बचाव पथक,नगरपालिका,पोलीसदल यांच्या संयुक्त बचाव मोहीमेने अथक परिश्रमाने अखेर विहीरीतुन गाय आणी वळुला बाहेर काढुन वाचवण्यात यश आले आहे.


                वाशीमच्या मंगरूळपीर  इथे  स्टेट बँक  परिसरात असलेल्या  एका  घरा शेजारी असलेल्या विहिरीत वळू आणि एक गाय पडल्याची घटना  घडली  सकाळी ११ वाजता च्या  सुमारास घडली. गाय आणि वळू एका  छोट्या ३० फुट खोल विहिरीत  पडल्याचे नागरिकांच्या  लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब  घटनेची माहिती  मंगरूळपीर नगरपालिका दिली संत गाडगेबाबा बचाव पथक आणि महसुल प्रशासन आणि नगर पालीकाच्या  अडीच तासाच्या  अथक परिश्रमानंतर  या  गाईसह वळू ला  बाहेर काढण्यात यश आले आहे.अरुंद विहीर असल्याने गाई आणि वळू ला विहिरीतून बाहेर काढणे  मोठं अवघड असताना  यंत्रणेच्या  मदतीने   दोन्ही जनावरांना बाहेर काढण्यात यश आले  या  मध्ये  वळू मोठ्या  प्रमाणात जखमी झाला  आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या