💥सचखंड गुरुद्वारा बोर्ड विषयी पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याशी चर्चा करणार - आमदार मोहनराव हंबर्डे


💥बाबा फतेहसिंघ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या उपोषणाला वाढता पाठिंबा💥

नांदेड (दि.26 मे 2022) - नांदेड येथील प्रसिद्ध धार्मिक संस्था सचखंड बोर्ड संस्थे विषयी च्या विविध मागण्या संदर्भात आपण स्वतः नांदेड जिल्ह्याचे मा.पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांशी चर्चा करून हजुरी साथ-संगत आणि बाबा फतेहसिंघ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या चक्री उपोषण या विषयी तोडगा काढू असे आश्वासन नांदेड दक्षिणचे क्षेत्राचे आमदार मा. मोहनराव हंबर्डे यांनी बुधवारी 25/05/2022 रोजी उपोषणकर्त्यांशी अशी चर्चा करताना दिली.


आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करण्याची मागणी घेऊन हजुरी साथ-संगत आणि बाबा फत्तेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे सुरू करण्यात आलेल्या चक्री उपोषणाचा स्थळाला भेट दिली गुरुद्वारा बोर्डाचे मुदत संपल्याने बोर्ड बरखास्त करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी तसेच मागील भाजप शासनाने गुरुद्वारा सचखंड बोर्ड कायद्या मधील कलम 11 चे संशोधन रद्द करून बोर्ड सदस्यानां स्वतःचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवडण्याची मुभा उपलब्ध व्हावी तसेच गुरुद्वारा बोर्डाचा मागील तीन वर्षाच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी मागील सहा वर्षापासून कलम 11 च्या विषय घेऊन समाजाने मोठ-मोठी आंदोलने केली पण महाराष्ट्र शासनातर्फे त्याविषयी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही गुरुद्वारा बोर्डावर स्थानिक अध्यक्ष असावा अशी सर्वांची मागणी आहे याविषयी पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल असे आमदार हंबर्डे यांनी सांगितले बाबा फतेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सरदार.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल आमदार मोहनराव हंबर्डे यांचे आभार मानले ज्यावेळी महानगरपालिकेचे माजी सभापती व नगरसेवक स. विरेंद्रसिंघ गाडीवाले ,मोहनसिंघ गाडीवाले,जसपालसिंग लांगरी, बीरेंद्र सिंघ बेदी,बंदीछोडसिंघ खालसा, प्रेमजितसिंघ शिलेदार, अवतारसिंघ पहरेदार, रविंद्रसिघ मोदी तेजपालसिंघ खेड, महेंद्रसिंघ लांगरी, रणजीतसिंघ गिल, प्रीतपाल सिंघ शाहू जसबिर सिंघ बुंगई, बीरेंद्र सिंग सुखाई खुशाल सिंघ कोटतिर्थवाले, सोनुसिंघ खालसा,नानकसिंघ सरदार, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती

 तसेच  प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख स. प्रितपाल सिंघ शाहू यांनी पाठिंबा पत्र देऊनु आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला त्या त्यावेळी प्रहार जनशक्ती चे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य स. नरेंद्रसिंघ ग्रंथी आणि त्यांच्या सहकार्याने पाठिंबा पत्र देऊन आंदोलनास सहभागी असल्याचे आश्वासन दिले तरी उपोषणास पाठिंबा वाढत असल्याने बोर्डाच्या विषयी लवकर निराकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या