💥रस्त्याच्या मधोमध उभारले खासगी विद्युत रोहित्र ; पादचाऱ्यांसह वाहनधारकांची सुरक्षा धोक्यात...!


💥अपघातानंतरच हे खांब हटवणार का ? संतप्त नागरिकांचा सवाल💥

चिखली :- चिखली शहरातील चव्हाण सिड्स कडून खाली येणाऱ्या अंजली टॉकीजचा रस्ता शहरातील मुख्य रस्ता आणि बाजाराचा रस्ता म्हणून परिचित आहे. या रस्त्यावर बाजाराच्या दिवशी म्हणजे सोमवारला बाजार करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनाची वर्दळ सुरूच असते. याच रस्त्याच्या मधोमध एका व्यापाराने खासगी  विद्युत रोहित्र (डी. पी.) उभारल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मोठा त्रास सोसावा लागत असून नागरिकांची व वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

रस्त्यात असलेल्या विजेच्या जनित्राला , रोहित्राला व खांब्याला धडकून अनेक दुर्घटना घडल्याचा घटना आहेत. यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेचे रोहित्र आणि जनित्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

चिखली शहरातील चव्हाण सिड्स कडून खाली येणाऱ्या अंजली टॉकीजचा रस्ता शहरातील  जिंगिग फॅक्टरीला लागून असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर असे विजेचे खांब व नव्याने उभारलेले रोहित्र असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे अपघातानंतरच हे खांब हटवणार का , असा संतप्त सवाल आता नागरिक विचारित आहेत.

 मात्र आजही अनेक रस्त्यांच्या मधोमध असलेले विजेचे खांब, रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत जनित्रे मात्र जशीच्या तशीच आहेत. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाचा हेतूच फोल ठरताना दिसतो. त्यातसर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक रस्त्यांच्या मधोमध हे खांब असल्याने वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तर तोल जाऊन अपघातही होत असतात.

   महावितरण आणि पालिका प्रशासनाबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अपघात झाल्यानंतरच स्थानिक प्रशासन हे खांब स्थलांतरित करणार आहे का, असा संतप्त सवालही आता नागरिक उपस्थित करत आहेत. तरी अंजली टॉकीज जवळील रस्त्यांच्या मधोमध असलेले रोहित्र हटवण्यात यावे अशी मागणी जागृत पत्रकार छोटु कांबळे यांनी महावितरण कार्यालयाकडे केली असून स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या