💥नांदेड-पुणे एक्सप्रेस आधुनिक कोच सह दररोज धावणार - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे


💥केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली माहिती💥


परभणी (दि.०७ मे २०२२) :- मनमाड मार्गे आठवड्यातून दोनदा धावणार्‍या  नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुणे पर्यंत करून ती आधुनिक एल हेच बी कोच सह दररोज धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे  प्रवाशी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. आज दि. ७ मे रोजी परभणी शहरात ना. दानवे दौरा होता आ. मेघना ताई बोर्डीकर यांच्या निवासस्थानी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तराने चर्चा करून रेल्वे प्रश्नांबाबत एक निवेदन सादर करण्यात आले.

 त्या वेळी त्यांनी उत्तर देताना मनमाड ते औरंगाबाद पर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात औरंगाबाद ते परभणी दरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम देखील पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती दिली. पुढील महिन्यात जालना स्थानकावर पीट लाइन चे उद्घाटन करणार असल्याचे सांगताना औरंगाबाद येथे देखील एक पीट लाइन होणार असल्याची  ग्वाही त्यांनी दिली. पंढरपूर रेल्वे  परत येताना लातूर रोड स्थानकावर दररोज तीन-तीन तासा पर्यंत उभे करण्या बाबत त्यांच्या निदर्शनास आणल्यावर त्यांनी संबधित रेल्वे अधिकाऱ्यांना त्याच वेळी  फोन लावून कोणत्याही रेल्वे स्थानकावर पंढरपूर रेल्वे ला बिनकामी उभे करू नये असे ठणकावून सांगितले. तसेच विभागातील सर्व रेल्वे गाड्यांचा लूज टाईम रद्द करण्या सोबत मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ला अतिरिक्त स्लीपर लावण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. या वेळी माजी आमदार श्री. रामप्रसाद बोर्डीकर, आ. मेघना ताई बोर्डीकर, आनंद भरोसे हे उपस्थित होते. मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या शिष्टमंडळात अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा. सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, प्रवीण थानवी, रवी किरण गंभीरे यांचा समावेश होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या