💥पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करा - रामेश्वर मुंडे


💥परळी तालुक्यातील गंगा पात्रातून सध्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या विविध ठिकाणच्या गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठया प्रमाणावर सुरू आहे, हा उपसा बेकायदेशीर रित्या सुरू आहे. नियमानुसार उपसा सुरू होत नाही बेकायदेशीर होणाऱ्या वाळू उपसा तात्काळ थांबवून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी  युवा नेते,तथा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मुंडे यांनी केली आहे. 

           तालुक्यातील मौजे पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसूल करावा, तालुक्यातील गंगा पात्रातून सध्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक मोठया प्रमाणावर होत असून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला जात आहे.  पोलिस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार होत आहे. हा वाळू उपसा थांबवावा यासाठी  अनेक वेळा तक्रारी, उपोषणही केले, पण पोलिस व महसूल प्रशासन कारवाई करण्याचे धाडस करत नाहीत. गोदावरी गंगा पात्रातील उपसा केलेल्या वाळूचे तात्काळ पंचनामे करावेत, बाहेरील जिल्हयाच्या अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करून अवैध वाळू साठयांवर छापे मारून त्याचे ऑडिट करावे तसेच  वाळू माफियाला सहकार्य करणाऱ्या महसूल व पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि सध्या सुरू असलेला अवैध वाळू उपसा तातडीने थांबविणेसाठी संबंधित यंत्रणेला लगेचच सूचना द्याव्यात, अवैध वाळू उपसा विरोधात आंदोलन, उपोषण करणारांना माफियांपासून सुरक्षा व संरक्षण देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दरारा ठेवून जनतेला न्याय देणे अपेक्षित असताना जनतेच्या वाटयाला दहशत आणि हप्तेखोर व चोरांना मात्र मोकळे रान दिले जात आहे. वाळू जेसीबी, बोटींग व इतर साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. तसेच काही राजकीय पाणी पुढाऱ्यांचे बागल बच्चे या अवैध धंदे उतरले आहेत. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून  वाळूचा उपसा केला जातो. तर वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे. तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. याची दखल घेत त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्तांनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची युवा नेते रामेश्वर म़ुंडे यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या