💥रोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचे शेतकऱ्यांना आवाहन....!


💥यामुळे शेतकरी कुटुंबाना कामासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरित होण्याची गरज पडणार नाही💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर : मौजे जोगवाडा ता.जिंतूर येथे जिल्हाधिकारी परभणी यांचे शुभहस्ते लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे उदघाटन करण्यात आले. परिसरातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून समूह पद्धतीने एका फळपिकाची निवड करून लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल व शेतकरी कुटुंबाना कामासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरित होण्याची गरज पडणार नाही असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सेलू श्रीमती अरुणा संगेवार, ऊपजिलाधिकरी रोहयो श्री अरुण जऱ्हाड, तहसीलदार जिंतूर  सखाराम  मांडवगडे यांनी अमृत सरोवर निर्मिती, इफेरफार नोंदणी, ईपीकपहाणी इ.बाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषि अधिकारी जिंतूर शंकर काळे यांनी बियाणे उगवण तपासणी, माती तपासणी, बीज प्रकिया, सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी, उताराला आडवी पेरणी इ.बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री भानुदास वाळके, महसूल व कृषि विभागाचे गाव पातळीवरचे सर्व कर्मचारी तसेच सोनापूर, सोसतांडा, जोगवाडा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने हजर होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या