💥स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत गेली जवळपास हजाराच्या जवळ...!💥इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे सहा आठवडय़ांत झालेली ही दुसरी वाढ💥

✍️ मोहन चौकेकर

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे सहा आठवडय़ांत झालेली ही दुसरी वाढ आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नघटकांपासून ते सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडणार आहे.

विनाअनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम सिलिंडरसाठी आता सध्याच्या ९४९.५० रुपयांऐवजी ९९९.५० रुपये मोजावे लागतील, असे सरकारी इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.                             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या