💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥ग्रामीण भागावर गरीबीचं मोठं संकट देशातील  १२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोक गरीब💥

✍️ मोहन चौकेकर

*खुशखबर! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल,पुढील दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

*काशी ज्ञानवापी मस्जिद सर्वेक्षणात शिवलिंग मिळाल्याचा दावा ; हिंदू पक्षाची कोर्टात धाव, परिसर तात्काळ सील करण्याचे कोर्टाचे आदेश

*राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राज्यातील भाजपा खासदारांचा पाठिंबा, म्हणाले विरोध करणाऱ्या बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल

*ग्रामीण भागावर गरीबीचं मोठं संकट देशातील  १२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोक गरीब

*केतकी चितळेच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवरुन सुजात आंबेडकरांचा संताप ; म्हणाले, “जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व 

 *अदानींची सिमेंट उद्योगात भक्कम 'पायाभरणी';* सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात उसळण

*श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, १६ प्रवाशी जखमी

*मुंबईमधील काळा घोडा परिसरात एसप्लानेड मॅनशन्स इमारतीत मोठी आग लागल्याची घटना घडली.यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली.

*गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच,ट्रक-ट्रॅक्टरची जाळपोळ, एटापल्लीत दहशत

*‘माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात हाडं मोडतील’,शोएब अख्तर उमरानच्या वेगाने बिथरला 

*वर्ष २०१९ च्या तुलनेत मागील २ वर्षात राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ ; माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारातंर्गत राज्य सरकारने दिली माहिती 

*शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात आणखी एक गुन्हा ; अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा  

*राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार ; एसपी कॉलेज मैदानावर ही सभा होणार, राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता 

*पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना महिला काँग्रेसचा विरोध ; महागाईविरोधात चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या 

 *अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा देणाऱ्या सदाभाऊ खोतविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक ; सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून आंदोलन

*राज्यसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांचे समर्थन ; संभाजीराजे यांच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा 

*बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथील आत्महत्याग्रस्त जाधव कुटुंबाला मदतीचा हात ; मुंबईतील मस्के ब्रदर्स फाउंडेशनकडून नामदेव जाधव यांच्या मुलीचा संपूर्ण खर्च उचलणार 

*बालविवाह प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे ;अमरावती जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलीचा विवाह लावणार होते 

*गुरे चोरून नेणाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्‍याने एकाचा मृत्‍यू ; रायगड जिल्ह्यातील घटना,१३ जणांवर गुन्हा दाखल 

*कोकणातील दुर्लक्षित गावांना आता ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार ; गावांचे यूनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मूल्यांकन होणार....

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या