💥वाशिम येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे....!


💥शहरातील नामांकीत शिक्षण संस्था असलेल्या बाकलीवाल विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांचा सहभाग💥


फुलचंद भगत

वाशिम - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत मान्सूनपूर्व तयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर १९ मे रोजी स्थानिक एकबुर्जी प्रकल्पस्थळी घेण्यात आले. या शिबीरात स्थानिक बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी विभागाच्या २० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. शिबीराला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक टवलारकर, नायब तहसीलदार श्री देवळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    जीवरक्षक सदाफळे यांनी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती दिली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर मानव व वित्तहानी वाचविणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात यंत्रणांना मदत करण्याची जबाबदारी ग्रामस्थांची असते. ग्रामस्थांच्या मदतीसाठी आपत्तीच्या काळात जेव्हा बचावपथके येतात तेव्हा त्यांना मदत करणे ग्रामस्थांचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी आपत्तीच्या काळात आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे व प्राथमिक उपचार कशा प्रकारे करायचा इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले.  या शिबीरात दिव्या पाईकराव, दिव्या लहानकर, मुक्ता वानखेडे, वेदांती वाघ, योगिनी धनगर, रोशनी खंदारे, शरयू आळणे, श्रद्धा भुसारी, जयश्री सरोदे, सुहानी तायडे, दिगंत उल्हामाले, क्षितिज उल्हामाले, शशांक बल्लाळ, पार्थ खोटे, युवराज मलीक, प्रसाद पंडितकर, कृष्णकांत चिपडे, आदित्य कालवे, दिपक इंगोले, ओम उलेमाले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुअ दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या