💥जुन्या आहेर प्रथेला फाटा देत लग्नात वऱ्हाडी मंडळींना देणार रोपट्याचा आहेर....!


💥वृक्ष लागवडीचा संदेश देणारी लग्नपत्रिका होतेय व्हायरल💥 

प्रतिनिधी/ गंगाखेड

वर्षानुवर्षांपासून वेगवेगळ्या वस्तू, कपड्यांचा आहेर देणाऱ्या प्रथेला फाटा देत लग्नाला उपस्थित असणाऱ्या प्रतेक वऱ्हाडी मंडळींना रोपट्याचा आहेर देण्यात येणार आहे. पडेगाव येथील बोबडे परिवाराची वृक्ष लागवडीचा संदेश देणारी आगळी-वेगळी लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आढळून येत आहे.

पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांची पुतणी ची सो का  पुनम व वर सुनील दंडवते कुंभकर्ण टाकळी यांचा विवाह बुधवार 1 जून रोजी पडेगाव येथे होत आहे . लग्न म्हटलं की आहेर आलाच. साडी काचेची वस्तू, भांडी आदि वस्तू आहेर देण्याची प्रथा आपल्या भागात आहे.  आहेर म्हणून देण्यात येणाऱ्या वस्तूतील काही वस्तू  एक तर कुणाच्याच कामाला येत नाहीत. पण यासाठी कुणाची तरी पैसे जातातच. काळाची गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या पुतणीच्या लग्नामध्ये रोपट्याचा आहेर करूत अशी संकल्पना मांडली. या संकल्पनेला बोबडे व  दंडवते या दोन्ही परिवारातील मंडळींनी चांगला प्रतिसाद दीला. या लग्नासाठी सुंदर पत्रिका तयार करण्यात आली असून कसलाही आहेर घेतला नाही पण येणाऱ्या प्रत्येकास रोपट्याचा आहे देण्यात येणार आहे अशी टीपही छापण्यात आलेली आहे. पहिल्याच पानावर  वृक्ष लागवडीचा संदेश देणारे संदेशही या लग्नपत्रिकेवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत . ह-भ-प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर ,ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर ,ह भ प रोहिदास महाराज मस्के ,ह-भ-प नागनाथ महाराज दत्तवाडीकर आदी संत महंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वृक्ष लागवडीतील अग्रभागी असलेले गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या