💥पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गाडेकर यांच्या गैरकारभाराचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे...!


💥वैद्यकीय अधिक्षक डॉ.हरिभाऊ गाडेकर यांच्या विरोधात आयुक्त काय कारवाई करतात याकडे💥

पूर्णा (दि.१५ मे २०२२) - येथील शासकीय ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ गाडेकर यांच्या गैरकारभारा विरोधात रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी रणशींग फुकले होते त्यांनी १४ जुन २०२१ रोजी डॉ.गाडेकर यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले होते की शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.गाडेकर हे विधवा अपंग वयोवृध्द महिला व नागरिकांकडून वयाच्या प्रमाणपत्राची फिस म्हणून बेकायदेशीरपणे या गोरगरीब जनसामान्यांची आर्थिक पिळवणूक करीत भ्रष्ट कारभार चालवीत आहेत.

या संदर्भात रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा करीत डॉ हरिभाऊ गाडेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीअंती    ही गंभीर बाब निदर्शनास आल्यावर त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली असून हा चौकशी अहवाल आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त श्री रामस्वामी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे कारवाई संदर्भाने पाठवण्यात आला होता या संदर्भात तक्रारदार राजकुमार सुर्यवंशी यांना देखील माहितीस्तव पत्र पाठवण्यात आले पत्र प्राप्त होताच राजकुमार सुर्यवंशी यांनी मुंबईचे आयुक्त श्री रामस्वामी यांची भेट घेऊन संदर्भाच्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा केली आणि त्यांना सर्व बाबी लक्षात आणून दिल्या असून या प्रकरणात आयुक्त रामास्वामी पुर्णा ग्रामीण रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक गाडेकर यांच्यावर काय कारवाई करतात याकडे पुर्णेकरांचे लक्ष लागले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या