💥संत नामदेव कृषी बाजार समिती सेनगाव समोर चालकांचे नियंत्रण सुटल्याने विसटा गाडी पलटी💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली : जिल्ह्यात आज पुन्हां दोन ठिकाणी अपघात झाले आहेत औंढा नागनाथ तालुक्यातील वाघी पाटी जवळ येथे जिनिंग समोरा टाटा मैजिक व मोटरसायकलचा अपघात झाला या मधे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे रमेश किशन कोटकर रा .आरळ ता वसमत येथील रहिवाशी असून याला वसमत येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनास्थळी कुरुंदा पोलिस दाखल झाले आहेत तर सेनगाव हिंगोली मार्गावर झाला आहे अपघात सेनगाव येथील संत नामदेव कृषी बाजार समिती सेनगाव समोर चालकांचे नियंत्रण सुटल्याने विसटा गाडी पलटी झाली आहे या मधे एक महिला गंभीर जखमी झाली आहे .गेल्या आठ दिवसात हिंगोली ते सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिक सुरूच आहे आठ दिवसात वेगवेगळ्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
0 टिप्पण्या