💥सामाजिक उपक्रमांनी रोहित भैया देशमुखांचा वाढदिवस साजरा....!


💥आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बियाणे वितरण💥


प्रतिनिधी

पाथरी :- तालुक्यातील योगेश्वरी शुगर्स चे चेअरमन तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे धाकले जिरंजीव योगेश्वरी शुगर्स चे कार्यकारी संचालक रोहित आर देशमुख यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


बुधवार ४ मे रोजी सकाळी अकरा वाजता रोहित आर  देशमुख यांचे परळी येथून लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स साखर कारखाण्यावर आगमन झाले. या वेळी ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन कारखाना कार्यालया समोर आयोजित सत्कार समारंभा साठी ते उपस्थित राहिले. या वेळी परिसरातील उस उत्पादक शेतकरी,कारखाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर पाथरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने संघाचे जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रपरीषदेच्या सोशल मिडिया सेल चे परभणी जिल्हा निमंत्रक पत्रकार किरण घुंबरे पाटील यांनी सत्कार करून पुढिल हंगामात या साखर कारखाण्याची गाळप क्षमता एक हजार मेट्रीक टनाने वाढत असल्या बद्दल रोहित देशमुखांना भेढा भरऊन  शुभेच्छा दिल्या या नंतर ते माजलगाव धारूर कडे सिरसाळा मार्गे रवाना झाले.

भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा योगेश्वरी शुगरचे एम.डी. रोहित देशमुख यांचा वाढदिवस भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी माजलगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना  आगामी खरिपातील पेरणी करिता बियाणांचे वितरण करण्यात आले.

भाजप युवा नेते रोहित देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो.यापूर्वी माजलगाव तालुक्यात टँकर द्वारे पाणी वितरण असेल किंवा इन्फन्ट इंडिया मधील बालकांना मदत असेल रोहित देशमुख सामाजिक  कार्यात नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. या वर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तसेच अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाना पेरणीसाठी बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. यापैकी ४ मे रोजी माजलगाव तालुक्यातील जवळपास पन्नास शेतकरी कुटुंबाना बियाणांचे कुपन देण्यात आले. आगामी दोन दिवसात धारूर व वडवणी मधील  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना बियाणे वितरित करण्यात येणार आहे.याशिवाय वडवणी तालुक्यातील गोवर्धन दराडे संचलित अनाथ मुलांच्या पसायदान प्रकल्पात रोहित देशमुखांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करून त्यांना प्रकल्पातील मुलां साठी किराणा सामान व शालेय साहित्याचे वितरण केले.  कार्यक्रमाचे संयोजन वडवणी मधील भाजप कार्यकर्त्यांनी केले होते.या प्रकल्पात आई वडिलांच छत्र हरवलेले ७५ बालके राहतात या प्रसंगी प्रकल्प संचालक गोवर्धन दराडे यांनी कीचन शेड ची समस्या मांडताच आगामी काळात या सेवा प्रकल्पात रोहित देशमुखांनी स्वखर्चातून किचन शेड उभारण्याचे जाहीर केले.

माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या जार चे उदघाटन करून रुग्णांना फळवाटप करण्यात आले.यासह काही दिवसांपूर्वी जुना मोंढा परिसरातील मुंढकर यांचे राहते घर आगीच्या भक्षस्थानी पडले होते त्या कुटुंबालाही रोहित देशमुखांनी आर्थिक मदत केली तसेच जय हिंद नगर मधील हनुमान मंदिरात पस्तीस बालकांना शालेय साहित्याचे वितरण केले. या प्रसंगी माजलगाव मतदारसंघाचे भाजप नेते आर टी जिजा देशमुख, गोरख धुमाळ, माजी नगराध्यक्ष दीपक मुंडे,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मनोज जगताप, शिवाजी तौर, वडवणी नगरसेवक  सचिन सानप, संतोष शिंदे, बाळासाहेब बादाडे, नगरसेवक ईश्वर होके, सचिन डोंगरे, राहुल शिंदे पाटील, गंगामसला माजी सरपंच डॉ अभिजित सोळंके, अॅड गणेश गवळी, पी जी सोळंके,बाळराजे लगड,भाजप विध्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष विजय रांजवन,गणेश तिडके, अमोल चव्हाण, अमोल तिडके, सुग्रीव तिडके,भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष त्रिम्बक धिरडे, पुरुषोत्तम पुरीचे उपसरपंच रघु शेळके, युवा नेते सचिन कराळे,अशोक माने,लवुळ चे माऊली शिंदे, संघ स्वयंसेवक रमाकांत कुलकर्णी, श्याम महाजन, भाजप नेते टाकनखार,भाजप भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष रामेश्वर चव्हाण, निथरूड चे भाजप नेते हनुमान बडे, पत्रकार संतोष रासवे,यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या