💥पुर्णेतील किलबिल संस्कार केंद्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली...!


💥कला व क्रिडा मानवी तन व मन निरोगी ठेवण्याचे काम करतात म्हणून हा छंद जोपासा - जेष्ठ कलावंत जगदीश जोगदंड

 पूर्णा (दि.०६ मे २०२२) - येथील किलबिल संस्कार केंद्राचा वासंतिक शिबिराचा गुरुवारी (ता.५ ) समारोप झाला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.महावीर नगर मध्ये संस्थाध्यक्ष डॉ गुलाबराव इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित जेष्ठ कलावंत तथा जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड यावेळी बोलतांना म्हणाले कि कालखंड कोणताही असो मानवाला मन रिझविण्यासाठी कलेचाच आसरा घ्यावा लागला. कला व क्रिडा मानवी तन व मन निरोगी ठेवण्याचे काम करतात म्हणून हा छंद जोपासा असे आवाहनही यावेळी श्री.जोगदंड यांनी केले.

            यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कलावंत जगदीश जोगदंड व सौ.सुक्षम जोगदंड यांच्यासह वसंत पांपटवार, दिलीप माने, सुक्षम जोगदंड, कांचन इंगोले , डॉ. संतोष गवळी यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितात प्रसाद जाधव, संगीता गवळी , संध्या रुद्रवार , अश्विनी माखणे , प्रदीप उर्फ गोलू मातानी , दीपक यादव, नागनाथ बिबेकर , राजू कदम , सखुबाई पांचाळ यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ मासाहेब , छत्रपती शिवाजी महाराज , राणी लक्ष्मीबाई ,महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तीरेखा साकर करत उत्तम अभिनयाचे प्रदर्शन केले. विराज  बिबेकर , अमायरा मातानी , अथर्व वळसे ,  कनक शर्मा , ऋत्विक यादव , ईश्वरी माखणे , शिवराज गुंजकर , श्रेया कऱ्हाळे , महिमा कुऱ्हे यांनी दहा हजार रुपयांची पारितोषिके पटकावली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी पालकांनी सजग राहत त्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम करावे असे आवाहन डॉ. गुलाबराव इंगोले यांनी केले. कलावंत हेच  राष्ट्राचे खरे वैभव असते. कला उत्साह वाढविण्याचे काम करते अशा भावना वसंत पांपटवार यांनी व्यक्त केल्या.यावेळी सुक्षम जोगदंड यांनी सहभागी चिमुकले व पालकांच्या उत्साहाचे कौतुक केले.  सूत्रसंचालन आदित्य तुंगनवार यांनी करून आभार मानले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या